Nashik | कोरोनाच्या 364 रुग्णांवर उपचार सुरू; नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 150 बाधित

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार नाशिकमध्ये सद्यस्थितीत कोरोनाच्या 364 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Nashik | कोरोनाच्या 364 रुग्णांवर उपचार सुरू; नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 150 बाधित
संग्रहित छायाचित्र.

नाशिकः जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार सद्यस्थितीत कोरोनाच्या 364 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच जिल्ह्यातील ४ लाख ३ हजार ५९८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आत्तापर्यंत 8 हजार 730 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण

सध्या उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 32, बागलाण 5, चांदवड 10, देवळा 2, दिंडोरी 7, इगतपुरी 4, कळवण 6, नांदगाव 1, निफाड 64, सिन्नर 43, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 3, येवला 22 अशा एकूण 200 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 150, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 5 तर जिल्ह्याबाहेरील 9 रुग्ण असून, एकूण 364 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 692 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांत नाशिक 7, दिंडोरी 2, इगतपुरी 1, नांदगाव 1, निफाड 6, सिन्नर 1, अशा एकूण 18 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमधे 97.19 टक्के, नाशिक शहरात 98.21 टक्के, मालेगावमध्ये 97.14 टक्के, तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.76 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.80 टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीण आतापर्यंत कोरोनामुळे 4 हजार 235 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 11, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील126 अशा एकूण 8 हजार 730 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दक्षता घेणे सुरू

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त आहे. हे ध्यानात घेता कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. विशेषतः प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी लसीचे दोन्ही डोस आवश्य घ्यावेत, असेही सांगण्यात आले आहे. नाशिकमध्ये 18 वर्षांवरील 13 लाख 63 हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी 11 लाख 87 हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, अद्यापही पावणेदोन लाख नागरिक लसीकरणाकडे फिरकलेही नाहीत. ही चिंतेची गोष्ट असून, त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

इतर बातम्याः

Needle free vaccin| सुईला भिऊ नका, तंत्र पाठीशी आहे; आता वेदनारहित लसीकरण, मशीन शरीरावर ठेवले की झाले, नाशिकमध्ये 8 लाख डोस

नाशिक जिल्ह्यात 6 नगरपंचायतीसाठी 402 अर्ज; देवळा येथे 4, निफाड 3, कळवणला 2 प्रभागांमधील निवडणूक रद्द

Nashik | मालेगावमध्ये डॉक्टरचे घर फोडले, 12 लाखांची चोरी; माणिक-मोती, हिरे, हिरव्या पाचूच्या दागिन्यांवर डल्ला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI