Nashik| 428 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; सिन्नर, निफाडमध्ये संख्या जास्त

नाशिक जिल्ह्यात दिवाळीनंतर रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. मात्र, अजूनही सिन्नर, निफाड या दोन तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या जास्तच आहे.

Nashik| 428 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; सिन्नर, निफाडमध्ये संख्या जास्त
संग्रहित छायाचित्र.


नाशिकः जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज गुरुवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 601 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 428 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 696 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. सध्या जिल्ह्यात लसीकरण वेगात सुरू आहे. ज्यांनी लसीकरण केले नाही, त्यांना रेशनपासून ते अनेक सुविधा नाकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे लसीकरणाला वेग आला आहे. याचा परिणाम म्हणजे रुग्ण वाढण्याच्या प्रमाणात प्रचंड घट झाली आहे. विशेषतः दिवाळीनंतर रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. मात्र, अजूनही सिन्नर, निफाड या दोन तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या जास्तच आहे.

येथे आहेत रुग्ण

उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 32, बागलाण 4, चांदवड 18, देवळा 6, दिंडोरी 3, इगतपुरी 4, कळवण 1, मालेगाव 3, नांदगाव 5, निफाड 75, सिन्नर 61, सुरगाणा 4, त्र्यंबकेश्वर 1, येवला 18 अशा एकूण 240 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 163, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 8 तर जिल्ह्याबाहेरील 17 रुग्ण असून, असे एकूण 428 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 725 रुग्ण आढळून आले आहेत.

कालचे बाधित

नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 2, बागलाण 1, चांदवड 6, देवळा 1, दिंडोरी 1, इगतपुरी 3, निफाड 1, सिन्नर 4, सुरगाणा 1 अशा एकूण 20 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

नाशिक जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.17 टक्के, नाशिक शहरात 98.20 टक्के, मालेगावमध्ये 97.11 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.78 टक्के इतके आहे.

आजवरचे मृत्यू

कोरोनाने नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात 4 हजार 211, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 1, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 696 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 601 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 428 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 696 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

-डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी

इतर बातम्याः

Nashik: स्वयंरोजगारासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज हवंय; जाणून घ्या योजना, पात्रता अन् कुठे साधावा संपर्क!

Baramati: ट्रकने दुचाकीला चिरडले; पती-पत्ती जागीच ठार, चालक फरार!

पुण्याच्या विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणार, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती, जागेची केली पाहणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI