साखरपुड्याच्या जेवणात पाल पडली, 45 जणांना विषबाधा

नांदेड : साखरपुड्याच्या जेवणाच्या भाजीत पाल पडल्याने 45 जणांना विषबाधा झाली. किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथे रात्री ही घटना घडली. विषबाधा झालेल्या सर्वांवर जलधरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. सावरगावातील जवारसिंग पडवळे यांच्या मुलाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाच्या भाजीत पाल पडली होती. या भाजीमुळे पहिल्याच पंगतीत जेवणाऱ्यांना विषबाधा …

, साखरपुड्याच्या जेवणात पाल पडली, 45 जणांना विषबाधा

नांदेड : साखरपुड्याच्या जेवणाच्या भाजीत पाल पडल्याने 45 जणांना विषबाधा झाली. किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथे रात्री ही घटना घडली. विषबाधा झालेल्या सर्वांवर जलधरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

सावरगावातील जवारसिंग पडवळे यांच्या मुलाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाच्या भाजीत पाल पडली होती. या भाजीमुळे पहिल्याच पंगतीत जेवणाऱ्यांना विषबाधा झाली. सर्वांना मोठ्या प्रमाणात उलट्याचा त्रास झाला.

याबाबत आरोग्य विभागाला कळवण्यात आले, त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी इस्लापूर येथील डॉक्टरांना जलधरा येथे जाण्याच्या सूचना दिल्या. या सर्व रुग्णांवर तातडीने जलधारा इथेच उपचार करण्यात आले.

दरम्यान, विषबाधा झालेल्या सर्वांची प्रकृती आता चांगली असून सकाळी सर्वांना घरी पाठवण्यात आले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *