धोका वाढतोय, नाशिक जिल्ह्यात अजूनही 481 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू!

नाशिक जिल्ह्यात सध्या 481 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 720 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

धोका वाढतोय, नाशिक जिल्ह्यात अजूनही 481 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू!
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 1:08 PM

नाशिकः जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज रविवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 056 कोरोना (Corona) बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 481 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 720 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अजूनही वाढतानाच दिसत आहेत. त्यातच दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन वेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. ओमिक्रॉनला डेल्टा वेरिएंट पेक्षा सातपट जास्त संक्रामक सांगितले जात आहे. ओमिक्रॉन ज्या दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे. तिथे गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर कमी होत आहे. यामुळे आफ्रिकन मेडिकल असोसिएशनने ओमिक्रॉन विषाणू त्यांच्या देशात गेल्या दोन महिन्यांपासून असून त्यामध्ये 45 वेळा बदल झाल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सक्रिय झाले आहेत. त्यांनी मास्क न लावल्यास 500 रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश दिला आहे.

या रुग्णांवर उपचार सुरू

उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 58, बागलाण 16, चांदवड 10, देवळा 08, दिंडोरी 24, इगतपुरी 07, कळवण 03, मालेगाव 01, निफाड 75, सिन्नर 90, त्र्यंबकेश्वर 02, येवला 12 अशा एकूण 306 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 154, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 07 तर जिल्ह्याबाहेरील 14 रुग्ण असून, अशा एकूण 481 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 257 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळलेल्या बाधितांमध्ये नाशिक 06, बागलाण 08, देवळा 04, दिंडोरी 03, इगतपुरी 01, कळवण 01, निफाड 03, सिन्नर 03, असे एकूण 29 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

नाशिक जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.12 टक्के, नाशिक शहरात 98.21 टक्के, मालेगावमध्ये 97.12 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.77 इतके आहे. नाशिक ग्रामीण भागात 4 हजार 228 जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 08, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 720 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इतर बातम्याः

नेमाडे साहित्य संमेलनाकडे फिरकतही नाहीत; अध्यक्षपद कसे मिळते याची सगळ्यांना कल्पना, पठारे यांचे खडेबोल

दोन वर्षे राक्षसी सत्तेची, भाजपचे अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष भोसले यांची महाविकास आघाडीवर जहरी टीका

Nashik| भाजप मंडल अध्यक्ष खुनातील संशयित बर्वेला 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, इतर संशयितांचा तपास सुरू

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.