500 च्या नोटांची घडी घालताच तुकडे, सांगलीतल्या प्रकाराने खळबळ

सांगली : सांगलीतील विटा शहरात 500 रुपयांच्या नोटांचे तुकडे पडू लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. 500 रुपयांच्या नोटांची घडी घालताच त्यांचे तुकडे होत आहेत. वाळलेले झाडाचे पान ज्याप्रमाणे हाताने चुरगळता, मोडता येते, त्याप्रमाणे 500 रुपयांच्या नोटा घड्या घालताच तुकेडे होत असल्याचा धक्कादायक प्रकार विट्यात समोर आला आहे. यामुळे प्रत्येकजण आपल्या 500 च्या नोटा तपासून पाहत […]

500 च्या नोटांची घडी घालताच तुकडे, सांगलीतल्या प्रकाराने खळबळ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

सांगली : सांगलीतील विटा शहरात 500 रुपयांच्या नोटांचे तुकडे पडू लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. 500 रुपयांच्या नोटांची घडी घालताच त्यांचे तुकडे होत आहेत. वाळलेले झाडाचे पान ज्याप्रमाणे हाताने चुरगळता, मोडता येते, त्याप्रमाणे 500 रुपयांच्या नोटा घड्या घालताच तुकेडे होत असल्याचा धक्कादायक प्रकार विट्यात समोर आला आहे. यामुळे प्रत्येकजण आपल्या 500 च्या नोटा तपासून पाहत आहेत.

विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक दळवी यांना सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी प्रात्यक्षिक दाखविले. राठोड यांनी जवळपास 500 रुपयांच्या 14 नोटांच्या बाबत (सात हजार रुपये) हा प्रकार घडल्याचे शाखा व्यवस्थापकांना सांगितले. रिझर्व बँक ऑफ इंडियाने तात्काळ या घटनेची दखल घ्यावी अशी मागणी राठोड यांनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांच्या शेजारी एक वृद्ध महिला राहते. ही महिला रोजंदारीवर काम करते. काही दिवसांपूर्वी या महिलेला सात हजारु रुपये मिळाले होते. ते तिने पाकिटात घालून घरातील कपाटात ठेवले होते. काल (14 मे) त्यातील साडेतीन हजार रुपये बाहेर काढून त्या बाजारात मिरच्या आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर रुमाल उघडून पैसे द्यायचे म्हणून 500 ची एक नोट काढताच नोटेचा तुकडा पडल्याचे आढळले. त्यानंतर तिने दुसरी नोट काढली असता ती नोटही घडी पडताच तुटत असल्याचे आढळले. घाबरुन त्या महिलेने सर्व नोटा घडी करून पाहिले असता त्या नोटांचे तशाच प्रकारे तुकडे पडत असल्याचे दिसले. हा प्रकार महिलेने अनील राठोड यांना सांगितला, त्यांनी तात्काळ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकांसोबत संपर्क साधला.

“आमच्या शाखेत आलेल्या करोडो रुपयांच्या अशा प्रकारच्या नोटा या वर्षानुवर्षे कपाट बंद असतात, त्यांना काहीही होत नाही”, असं उत्तर शाखा व्यवस्थापक यांनी दिले. परंतू राठोड यांचे त्यावरच समाधान झाले नाही. त्यांनी ही गोष्ट आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निदर्शनास आणावी असा आग्रह केला. त्यानंतर सध्या राठोड यांना 500 रुपयांची एक नोट जी बऱ्यापैकी एका बाजूने तुटली होती. ती बदलून देण्यात आली. परंतू उरलेले तीन हजार रुपयांचे तुकडे आम्ही बदलून देऊ शकत नाही, असं बँक व्यवस्थापक यांनी उत्तर दिले.

विशेष म्हणजे, “नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटा या पूर्वीच्या नोटांच्या तुलनेत हलक्या दर्जाच्या आहेत”, असं शाखा व्यवस्थापक यांनी सुद्धा मान्य केलं आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली असून अनेकांनी आपापल्या 500 च्या नोटा बदलून अथवा मोडून सुट्टे करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत बँक ऑफ इंडिया अथवा संबंधित  यंत्रणेने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.