58 कॉलेजचं संलग्नीकरण रद्द, नागपूर विद्यापीठाची कडक कारवाई

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने तब्बल 58 महाविद्यालयांचं संलग्नीकरण रद्द केलं आहे. विद्यापीठाच्या नियमांचं पालन न केल्यामुळे या महाविद्यालयांचं संलग्नीकरण रद्द करण्यात आलं आहे. नागपूर विद्यापीठाच्या या 58 महाविद्यालयात नियमित शिक्षकांची नियुक्ती न करणे, सुविधा नसणे, शिवाय विद्यापीठांच्या इतर नियमांचं पालन न केल्यामुळे या महाविद्यालयाचं संलग्नीकरण रद्द करण्यात आलंय. या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश …

58 कॉलेजचं संलग्नीकरण रद्द, नागपूर विद्यापीठाची कडक कारवाई

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने तब्बल 58 महाविद्यालयांचं संलग्नीकरण रद्द केलं आहे. विद्यापीठाच्या नियमांचं पालन न केल्यामुळे या महाविद्यालयांचं संलग्नीकरण रद्द करण्यात आलं आहे. नागपूर विद्यापीठाच्या या 58 महाविद्यालयात नियमित शिक्षकांची नियुक्ती न करणे, सुविधा नसणे, शिवाय विद्यापीठांच्या इतर नियमांचं पालन न केल्यामुळे या महाविद्यालयाचं संलग्नीकरण रद्द करण्यात आलंय. या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.

नागपूर विद्यापीठानं संलग्नीकरण रद्द केलेल्या महाविद्यालयांमध्ये मोठ्या शिक्षण संस्थांचाही समावेश आहे. यात नागपूर जिल्ह्यातील तब्बल 31 महाविद्यालयं, तर इतर महाविद्यालयं भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्याती महाविद्यालयं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 2001 साली 247 संलग्नित महाविद्यालयं होती. हीच संख्या 2015 साली 650 च्या वर गेली. म्हणजे, 15 वर्षात 400 हून अधिक नवीन महाविद्यालयं सुरु झाले. त्यानंतर गडचिरोली आणि चंद्रपूरसाठी गोंडवाना विद्यापीठ स्थापन झाले. तिथे 172 महाविद्यालयं जोडीली गेली. त्यामुळे नागपूर विद्यापीठाने महाविद्यालय संलग्नीकरण देण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली.

स्थानिक चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या पाहणीत 40 टक्क्यांहून कमी गुण मिळणाऱ्या महाविद्यालयांना संलग्नीकरणाचे नूतनीकरण नाकारण्याचे धोरण ठरवण्यात आले. तसेच, महाविद्यालयांमध्ये नियमित शिक्षक, विद्यार्थी नाहीत, अशा महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या तीन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीपासून विद्यापीठाकडे एकदाही संलग्नीकरण नूतनीकरणासाठी अर्ज न करणाऱ्या महाविद्यालयांवर आता कारवाईचा बडगा विद्यापीठाने उचलला आहे. या महाविद्यालयांमध्ये राजीकय नेत्यांच्या महाविद्यालयांचाही समावेश आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *