Nashik| 6 नगरपंचायत निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; 21 डिसेंबर रोजी मतदान

जिल्ह्यातील 6 नगरपंचायती आणि 230 ग्रामपंचायतीच्या 393 जागांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

Nashik| 6 नगरपंचायत निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; 21 डिसेंबर रोजी मतदान
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 2:54 PM

नाशिकः जिल्ह्यातील 6 नगरपंचायती आणि 230 ग्रामपंचायतीच्या 393 जागांसाठीच्या निवडणूक प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी सहा वाजता थंडावणार आहेत. या ठिकाणी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सध्या जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, देवळा, कळवण, सुरगाणा आणि पेठ या सहा नगरपचंयातीची निवडणूक ऐन रंगात आली आहे. विशेषतः मंत्री बाळासाहेब थोरात, दादा भुसे आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या निवडणुकीत अनेक ठिकाणी सभा घेत प्रचाराची राळ उडवून दिली, तर मंत्री छगन भुजबळ यांनी विदर्भात अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या.

अशी होतेय लढत

दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत. कळवमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर सामना रंगणार आहे. पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जागांवर निवडणूक होत आहे. निफडामध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होईल. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होणार आहे. देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होणार आहे.

येथे नव्याने सोडत

राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील निफाड, देवळा, दिंडोरी, कळवण तालुक्यातील 11 ओबीसी राखीव जागा आता खुल्या प्रवर्गात मोडणार आहेत. त्यासाठी नव्याने 23 डिसेंबर रोजी महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. उमेदवारांना 29 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 10 जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या जागांचे 18 जानेवारी रोजी मतदान होईल आणि निकाल मात्र 19 जानेवारी रोजी लागेल.

मतदानाची चोख तयारी

नाशिक जिल्ह्यात राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार निफाड, पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा व दिंडोरी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रशासनाने चोख तयारी केली आहे. यादिवशी सदर नगरपंचायतीच्या क्षेत्रातील मतदानासाठी स्थानिक क्षेत्रात पूर्ण दिवस सुट्टी जाहीर केली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात येणाऱ्या आस्थापना, कारखाने, दुकाने यांना 21 डिसेंबर 2021 रोजीची सुट्टी लागू रहाणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील निफाड, पेठ,दिंडोरी, सुरगाणा, कळवण व देवळा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी इत्यादींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

Nashik| ऐन निवडणुकीच्या तोंडावर युवासेनेचे शक्तीप्रदर्शन; नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन, 2 हजार पदाधिकारी येणार

Nashik| प्रियकराच्या मदतीने पतीच्या ‘माये’वर पत्नीचा डल्ला; ऐकावं ते नवलच…!

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.