काढले 1000 रुपये, मिळाले 1600, ATM मधून प्रत्येक विड्रॉलमागे 600 रुपये एक्स्ट्रा, मशीन आहे की… नागपुरात काय चमत्कार ?

एटीएममधून 500 रुपये काढले तर 1100 रुपये मिळत होते, तर 1000 रुपये काढल्यावर हातात चक्क 1600 रुपये येत होते. म्हणजेच एटीएममधून 600 रुपये जास्त येत होते. या घटने माहिती मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांनी या एटीएमकडे तडक धाव घेतली, एटीएमबाहेर अक्षरश: झुंबड उडाली होती.

काढले 1000 रुपये, मिळाले 1600, ATM मधून प्रत्येक विड्रॉलमागे 600 रुपये एक्स्ट्रा, मशीन आहे की... नागपुरात काय चमत्कार ?
ATM मधून प्रत्येक विड्रॉलमागे 600 रुपये एक्स्ट्रा,
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 12:23 PM

नागपूरमधील एका बँकेच्या एटीएमबाहेर अक्षरश: झुंबड उडाली होती. कारणही तसंच होतं. एवढी गर्दी होण्याचं कारण म्हणजे तिथे झालेली एक तांत्रिक चूक, पण त्यामुळे पैसे काढणाऱ्यांची मात्र चैन होती. असं नक्की घडलं तरी काय ? तर गणेश चतुतर्थीच्या एक दिवस आधीच 5 सप्टेंबरला Axis बँकेच्या एटीएममधून प्रत्येक विड्रॉलमागे 600 रुपये अतिरिक्त मिळत असल्याने लोकांनी पैसे काढण्यासाठी झुंबड केली. ही बातमी कळताच शहरातील नागरिकांनी तेथे धाव घेत पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील खापरखेडा भागात Axis बँकेचे एटीएम आहे. तेथे काही तांत्रिक चुकींमुळे एटीएममधून जास्त पैसे येत होते. 5 सप्टेंबरच्या दुपारी ही घटना उघडकीस आली. तेथे पैसे काढायला गेल्यावर ज्या लोकांनी 500 रुपये काढले त्यांना 1100 रुपये मिळत होते. तर ज्यांनी 1000 रुपये काढले त्यांना थेट 1600 रुपये मिळत होते. म्हणजेच पैसे काढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तब्बल 600 रुपये जास्त मिळत होते. याबद्दल माहिती मिळाल्यानंतर शहरातील इतर नागरिकांनीही ताबडतोब तेथे धाव घेत पैसे काढण्याचा प्रयत्न केला.

तांत्रिक त्रुटीमुळे एटीएमला बसला फटका

एटीएम मध्ये पैशांच्या ट्रेमध्ये नोटा भरताना तांत्रिक चूक झाल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं बोलल जात आहे. खापरखेडा येथील स्थानिक नागरिक अरुण महाजन यांना हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी लगेच स्थानिक पोलीस आणि संबंधित बँकेला कळवले. तेव्हा दुपारी एटीएम बंद करून दुरूस्ती करण्यात आली. मात्र तोपर्यंत 3 लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे निघून गेल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले.

दुपारी एटीएम बंद करत दुरुस्ती करण्यात आली त्यानंतर संध्याकाळी सात वाजता एटीएम सुरू झाले. स्थानिक नागरिक अरुण महाजन यांनी या सगळ्या प्रकार वेळीच लक्षात आणून दिला नसता तर यामध्ये आणखी फटका बँकेला बसला असता.

'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.