पोलीस शिपाईपदाची 6100 पदे भरली, 2018 च्या प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थ्यांची नियुक्ती नाहीच

पोलीस शिपाई भरती 2018 मधील भरतीची सर्व पदे भरण्यात आली असल्याने प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांचा नियुक्तीसाठी विचार शक्य नाही, असे गृहविभागामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.

पोलीस शिपाईपदाची 6100 पदे भरली, 2018 च्या प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थ्यांची नियुक्ती नाहीच
MAHARASHTRA POLICE

मुंबई : पोलीस शिपाई भरती 2018 मधील प्रतिक्षा यादीतील महिला उमेदवाराने नियुक्तीबाबत तिच्यावर व अन्य 800 उमेदवारांवर अन्याय होत असून आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागेल असे निवेदन समाजमाध्यमावर केले आहे. त्याबाबत गृह विभागामार्फत पोलीस शिपाई भरती 2018 मधील भरतीची सर्व पदे भरण्यात आली असल्याने प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांचा नियुक्तीसाठी विचार शक्य नाही, असे गृहविभागामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.

456 प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांच्या नियुक्त्या झाल्या

पोलीस शिपाई पदाच्या भरतीप्रकरणी संबंधित घटक प्रमुख हे नियुक्ती प्राधिकारी असल्याने त्यांच्या स्तरावर प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली होती आणि ज्या उमेदवारांनी काही कारणास्तव नियुक्ती नाकारली होती, त्यांच्या रिक्त पदावर प्रतीक्षायादीतील त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या असून, याप्रकारे एकूण 456 प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्यात. एकंदरीत वर्ष 2018 मध्ये 6100 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि ही सर्व पदे सदर भरती प्रक्रियेमधून भरण्यात आली आहेत.

5297 रिक्त पदांच्या भरतीसाठी दोन टप्प्यांत भरती प्रक्रिया पूर्ण

वर्ष 2019 मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील 5297 रिक्त पदांच्या भरतीसाठी दोन टप्प्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, 03/09/2019 आणि 30/11/2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातींच्या अनुषंगाने एकूण 11, 97, 415 अर्ज प्राप्त झालेत. ही भरती प्रक्रिया ऑक्टोबर 2021 अखेर पूर्ण करण्याचे संकल्पित असून, त्यादृष्टीने कार्यवाही प्रगतिपथावर आहे.

सशस्त्र पोलीस शिपाईपदाची रिक्त असलेली 6100 पदे भरली

सशस्त्र पोलीस शिपाई यांची (पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई यांची) रिक्त असलेली 6100 पदे भरण्यासाठी mahapolice.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर 05/02/2018 ते 28/02/2018 रोजी अर्ज मागविण्यात आले होते. सदर भरती प्रक्रियेत एकूण 10,74,407 एवढ्या उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. सदर भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी व लेखी परीक्षा या क्रमाने परीक्षा घेऊन घटक प्रमुखांच्या आस्थापनेवर रिक्त असलेली 6100 पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली.

संबंधित बातम्या

पदोन्नतीचा विषय मार्गी लावला, पोलीस भरतीबाबतही लवकरच निर्णय जाहीर करु- गृहमंत्री

कुठल्याही परिस्थितीत 5200 पदं तातडीने भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा, एकूण 12200 पदांची भरती

6100 posts of police peon filled, no recruitment of 2018 students

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI