अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा 7 दिवसांची संचारबंदी; तीन शहरं कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित

या तिन्ही शहरात 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ तशीच राहणार आहे.

  • सुरेंद्रकुमार आकोडे, टीव्ही 9 मराठी, अमरावती
  • Published On - 17:37 PM, 27 Feb 2021
अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा 7 दिवसांची संचारबंदी; तीन शहरं कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित
Lockdown

अमरावती: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात 7 दिवस संचारबंदी वाढवलीय. अमरावती, अचलपूर ,अंजनगाव सूर्जी शहर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेत. या तिन्ही शहरात 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ तशीच राहणार आहे. तसेच नंतरची स्थिती पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचंही प्रशासनानं सांगितलंय. (7 Day Curfew In Amravati District Again; Three Cities Declared As Containment Zones)

अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी होता लॉकडाऊन

तत्पूर्वी अमरावतीत 22 फेब्रुवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी होता. लॉकडाऊनची मुदत 1 मार्चला सकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अनलॉकनंतर पुकारला गेलेला पहिलाच लॉकडाऊन होता. मात्र आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊन नंतरही जिल्ह्यात कोरोनाबाधितांचं प्रमाण कमी झालेलं दिसत नाही. त्यामुळे अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आलीय.

12 कंटेन्मेंट झोन घोषित

अमरावतीची परिस्थिती पाहता अमरावती महापालिकेने आधीच अमरावती शहरात 12 कंटेन्मेंट झोन घोषित केलेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसांपर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिलेत. तर या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आलेत. या 12 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता.

लॉकडाऊनमुळे बस सेवा देखील बंद

अमरावतीमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे बस सेवा देखील बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होतं आहे. अमरावती हे विभागाचे ठिकाण असून या ठिकाणी नागपूर, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, औरंगाबादसह इतर जिल्ह्यात बस सेवा सुरु राहतात. मात्र, इतर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद असल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. बाहेर काढले जाणारे अनेक प्रवासी बस स्थानकामध्ये थांबलेले आहेत. लॉकडाऊन असल्याने बस सेवा बंद आहे.

संबंधित बातम्या

मोठी बातमी : अमरावतीत आठवडाभरासाठी लॉकडाऊन, मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

7 Day Curfew In Amravati District Again; Three Cities Declared As Containment Zones