एसटी आणि कारच्या धडकेत एकाच गावातील 7 जणांचा मृ्त्यू

कोल्हापूर : गडहिंग्लज येथील महागाव रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच गावातील एकूण 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एसटी आणि कारच्या धडकेमुळे हा अपघात झाला. अपघातातील सर्व मृत नूल या गावचे रहिवासी होते. गडहिंग्लज येथे आज दिवसभरात तब्बल 9 लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. सकाळी याच रस्त्यावर एका कार अपघातात दोन जणांचा …

एसटी आणि कारच्या धडकेत एकाच गावातील 7 जणांचा मृ्त्यू

कोल्हापूर : गडहिंग्लज येथील महागाव रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच गावातील एकूण 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एसटी आणि कारच्या धडकेमुळे हा अपघात झाला. अपघातातील सर्व मृत नूल या गावचे रहिवासी होते.

गडहिंग्लज येथे आज दिवसभरात तब्बल 9 लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. सकाळी याच रस्त्यावर एका कार अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या धक्कादायक घटनेमुळे सध्या येथील वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चंदगडहून नूलला जाताना सुमोला एसटीची धडक बसली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच शेजारील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सध्या रस्त्यामध्येच असलेली अपघाती वाहनं बाजूला करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.

गडहिंग्लजमधील हा दुसरा अपघात असल्याने एकूण 9 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सकाळी झालेल्या अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या झालेल्या अपघातावर पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *