पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

उस्मानाबाद : उमरगा येथील तलमोड गावात पोलिसांच्या मारहाणीत एका 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दत्तू मोरे असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी उमरगा येथे कोम्बिंग ऑपरेशन राबवले, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मोरे यांचा जीव गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तलमोड कार दुर्घटना झाली होती. त्यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना …

पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

उस्मानाबाद : उमरगा येथील तलमोड गावात पोलिसांच्या मारहाणीत एका 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दत्तू मोरे असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी उमरगा येथे कोम्बिंग ऑपरेशन राबवले, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मोरे यांचा जीव गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

तलमोड कार दुर्घटना झाली होती. त्यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना अटक करण्यासाठी परिसरात बुधवारी रात्री 1 वाजता कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यावेळी पोलिसांनी गावातील नागरिकांना मारहाण केली. तसेच कोंबिंग ऑपरेशनदरम्यान घरांची दारे तोडत संशयितांना अटक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.

दरम्यान, पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 70 वर्षीय वृद्धाला मारहाण झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली. तसेच मृतदेह थेट पोलीस ठाण्यात ठेवत आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा घेतला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *