देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, राज्यात कडेकोट बंदोबस्त

मुंबई: देशभरात आज 70 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारत मातेचा जयजयकार होत आहे. 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात तसेच मुंबई आणि राज्यात काडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्लीत राजपथावर तीनही दलाचे पथसंचलन होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोंदीसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. इकडे मुंबईतील शिवाजीपार्कवरही पथसंचलन आयोजित करण्यात आलं आहे. …

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, राज्यात कडेकोट बंदोबस्त

मुंबई: देशभरात आज 70 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारत मातेचा जयजयकार होत आहे. 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात तसेच मुंबई आणि राज्यात काडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्लीत राजपथावर तीनही दलाचे पथसंचलन होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोंदीसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

इकडे मुंबईतील शिवाजीपार्कवरही पथसंचलन आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित आहेत.

मुंबईतील रेल्वे स्थानक, गेटवे ऑफ इंडिया, विधानभवन, मंत्रालय आणि आरबीआय बँकसह महत्त्वाच्या सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नुकतेच दहशतवादविरोधी पथकाने मुंब्रा आणि औरंगाबाद येथून संशयित अतिरेक्यांना अटक केली आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राज्यात आणि देशात महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणत्याही अफवेला बळी न पडता प्रजासत्ताक दिन उत्साहात साजर करावा. असं पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी सांगितले. तसेच सर्व पोलिसांच्या रज्जा रद्द करण्यात आला असून मुंबईत कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

नागरिकांनी सतर्क राहावे तसेच कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवा. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस महासंचालक दत्ता पडसलीगकर यांनी नागरिकांना दिले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *