नाशिक जिल्ह्यात 723 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 238 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 723 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात 723 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
संग्रहित छायाचित्र.


नाशिकः जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 238 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 723 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 651 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नाशिक ग्रामीण भागात नाशिकमध्ये 48, बागलाण 7, चांदवड 30, देवळा 5, दिंडोरी 20, इगतपुरी 4, कळवण 13, मालेगाव 4, नांदगाव 10, निफाड 114, पेठ 1, सिन्नर 125, त्र्यंबकेश्वर 4, येवला 51 असे एकूण 436 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 254, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 16 तर जिल्ह्याबाहेरील 17 रुग्ण असून असे एकूण 723 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 9 हजार 612 रुग्ण आढळून आले आहेत. हॉटस्पॉट ठरणाऱ्या सिन्नर तालुक्यात आतापर्यंत 508 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अनलॉकनंतर येथील रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आली आहे. सध्या तालुक्यातील 50 गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. मात्र, दुसरीकडे सिन्नर तालुक्यात लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. त्यात 1 लाख 63 हजार 408 म्हणजे पात्र व्यक्तींपैकी 59 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 58 हजार 146 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. टक्केवारीत हे प्रमाण जवळपास 21 टक्के इतके आहे. आतापर्यंत साधारणतः 2 लाख 21 हजार 554 जणांना डोस देण्यात आला आहे. वाढते कोरोना रुग्ण पाहता हे लसीकरण वाढवण्यात येणार आहे.

उत्तर महाराष्ट्राला कोरोनाने तूर्तास दिलासा दिला असून, विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चक्क 97.63 टक्क्यांवर गेले आहे. विभागात आजपर्यंत 9 लाख 88 हजार 397 रुग्णांपैकी 9 लाख 65 हजार 05 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत 3 हजार 560 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत विभागात 19 हजार 777 रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.63 टक्के आहे, तर मृत्युदर 2.00 टक्के इतका आहे.

नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 70 लाख 68 हजार 510 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 9 लाख 88 हजार 397 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 09 हजार 322 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 99 हजार 896 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 778 रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के इतके आहे. आजपर्यंत 8 हजार 648 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 2.11 टक्के आहे.

इतर बातम्याः

महंगाई डायन खाए जात हैः डोक्याला शॉट; नाशिकमध्ये डिझेल शंभरच्या पुढे!

परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरण; पुनमियाची अटकपूर्व जामिनासाठी नाशिक कोर्टात धाव

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI