92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला झोकात सुरुवात

यवतमाळ: देशभरात वादामुळे गाजलेल्या 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला झोकात सुरुवात झाली. आज 11 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान यवतमाळमध्ये साहित्याचा मेळा भरणार आहे. दुपारी 4 वाजता साहित्य संमेलनाचं उद्घाटन होईल. प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं उद्घाटनाचं निमंत्रण रद्द केल्यानंतर, साहित्यिकांचा बहिष्कार आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा दोन दिवसापूर्वीच राजीनामा, या […]

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला झोकात सुरुवात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

यवतमाळ: देशभरात वादामुळे गाजलेल्या 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला झोकात सुरुवात झाली. आज 11 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान यवतमाळमध्ये साहित्याचा मेळा भरणार आहे. दुपारी 4 वाजता साहित्य संमेलनाचं उद्घाटन होईल. प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं उद्घाटनाचं निमंत्रण रद्द केल्यानंतर, साहित्यिकांचा बहिष्कार आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा दोन दिवसापूर्वीच राजीनामा, या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाचं उद्घाटन कोण करणार असा पेच होता, तोही काल सुटला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली सुधाकर येडे या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत.

यवतमाळमधून ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. पारंपारिक वेशभूषेत महिला, मुली, पुरुषांनी या ग्रंथदिंडीत सहभाग घेतला.

बोलायला शब्द नाहीत : वैशाली येडे

कधी वाटलं नव्हतं की असा काही मान मिळेल. त्यांची आठवण खूप येतेय, आठवण येऊ नये म्हणून त्यांचा फोटोही लपवून ठेवायचे. नवरा गेल्यानंतर कसं कसं जगलोय ते माझं मलाच माहिती, पण हिंमत हरले नाही. दोन मुलांकडे बघून कष्ट करायला सुरूवात केली, आपलं जे झालं ते इतर कोणाचं होऊ नये असं नेहमी वाटायचं. म्हणून ‘तेरवं’ हे नाटक सुरू केलं आणि लोकांनीही त्याचं स्वागत केलं. आज खूप आनंद होतोय, पण बोलायला शब्द नाहीत. खूप दुःख सहन केलंय, त्याचं हे फळ असावं. – अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांची प्रतिक्रिया

कोण आहेत वैशाली सुधारकर येडे?

वैशाली सुधाकर येडे यांच्या हस्ते 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन होत आहे. वैशाल येडे या यवतमाळमधील राजुर तालुक्यातील कळंब येथील आहेत. वैशाली येडे यांना दोन मुलं आहेत. तीन एकर जमिनीवर शेती आणि अंगणवाडी मदतनीस म्हणून काम त्या करतात.

‘तेरवं’ नावाच्या नाटकाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्याच्या विरोधात वैशाल येडे काम करतात. आपल्या वाट्याला आलेला संघर्ष इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी वैशाली सुधाकर येडे यांचं मोठं काम आहे.

साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सामान्य महिलेला हा मान मिळाला असून, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला साहित्य संमेलन उद्घाटनाचा मान देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचा काढता पाय?

वादग्रस्त साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांनीही काढता पाय घेतल्याची चर्चा आहे. अनेक साहित्यिकांनी याआधीच साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला आहे.  आता मुख्यमंत्रीही आजच्या उद्धाटनासाठी येणार नाहीत. मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा पूर्वनियोजित असल्याची माहिती, पालकमंत्री मदन येरेवार यांनी दिली. 

पोलिसांचा बंदोबस्त

यवतमाळ इथे होत असलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी 200 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी- अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहेत. सुरक्षेच्यादृष्टीने सर्व योग्य ती खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

पेच मिटला, साहित्य संमेलनाचं उद्घाटन शेतकरी महिला करणार   

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा   

साहित्य संमेलन : उद्घाटक म्हणून ‘या’ तीन नावांची शिफारस   

साहित्य संमेलनावर साहित्यिकांचे बहिष्कारास्त्र  

मनसेचा साहित्य संमेलन उधळण्याचा इशारा 

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.