जेएनपीटीत 45 हेक्टर क्षेत्रावरील सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाचा शुभारंभ, एकाचवेळी 1500 ट्रेलर पार्क करण्याची क्षमता

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

जेएनपीटीत 45 हेक्टर क्षेत्रावरील सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाचा शुभारंभ, एकाचवेळी 1500 ट्रेलर पार्क करण्याची क्षमता

रायगड : जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये (जेएनपीटी) सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाचा शुभारंभ करण्यात आला आहे. निर्यात कंटेनरसाठीचा खर्च आणि वेळेची बचत करण्यात मदत करणार्‍या डायरेक्ट पोर्ट एन्ट्रीला चालना देण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम आहे. दरम्यान जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझामधील सुविधांचा आढावा घेतला. (A 45-hectare centralized parking plaza inaugurated at JNPT, Capacity to park 1500 trailers simultaneously)

हा पार्किंग प्लाझा तब्बल 45 हेक्टर क्षेत्रात पसरला आहे. तसेच या पार्किंग प्लाझाची एकाचवेळी 1,538 ट्रॅक्टर ट्रेलर पार्क करण्याची क्षमता आहे. अशा प्रकारची योजना आखणारे जेएनपीटी हे भारतातील एकमेव बंदर आहे. दरम्यान पूर्वीच्या ठिकाणी निर्यात कंटेनर वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलर्सच्या पार्किंगचे एकत्रीकरण करण्यासाठी प्लाझा पूर्णपणे तयार केला आहे.

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) कस्टम सुविधांसह कंटेनर ट्रॅक्टर ट्रेलर्ससाठी एक नवीन सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा (सीपीपी) सुरू केला आहे. व्यवसाय सुलभतेसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. या अत्याधुनिक सुविधा आणि सेवा तरतूदींसह कस्टमद्वारे दस्तऐवज प्रक्रिया सोपी होईल.

संबंधित बातम्या

परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात, जेएनपीटी बंदरात 600 टन कांदा दाखल

दुबईतील खजूराच्या नावाखाली परदेशी सिगारेटची तस्करी, जेएनपीटी बंदरातून 11 कोटींचं घबाड जप्त

कांद्याच्या नावाखाली रक्तचंदनाची तस्करी, जेएनपीटीतून 4 कोटींचे घबाड जप्त

(A 45-hectare centralized parking plaza inaugurated at JNPT, Capacity to park 1500 trailers simultaneously)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI