झोपेतून उठताना पडला, गंभीर जखम होऊन तरुणानं जीव सोडला! कोकणातील हृदयद्रावक घटना

बाळाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा संतोष हा झोपला होता. मात्र झोपेतून उठत असताना संतोष हे हॉलमध्येच पडले. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.

झोपेतून उठताना पडला, गंभीर जखम होऊन तरुणानं जीव सोडला! कोकणातील हृदयद्रावक घटना
झोपेतून उठताना तरुण पडला आणि दगावला!
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Feb 08, 2022 | 8:48 AM

रत्नागिरी : झोपेतून उठताना (Waking up from Sleep) केलेला हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो, असं कुणी म्हटलं, त्याकडे फारचं गांभीर्य कुणी घेण्याची शक्यता कमीच आहे. पण रत्नागिरीतल्या एका धक्कादायक (Shocking incident in Ratnagiri) घटनेनं हीच गोष्ट अधोरेखित केली आहे. रत्नागिरीत एकाचा झोपेतून उठताना पडून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना घडली आहे रत्नागिरी शहरातील टिळकआळीमध्ये! झोपेतून उठताना एकाच्या डोक्याला अत्यंत गंभीर जखम झाली. यानंतर तरुणाला उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. पण उपचारादरम्यानच गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्यानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची (Sudden Death) नोंददेखील करण्यात आली असून पोलिस याप्रकरणी अधिक तपासही करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं? कसं घडलं?

रत्नागिरीतल्या टिळकआळी इथं घोसाळकर कुटुंबीयत राहतात. बाळाजी शंकर घोसाळकर यांचं कुटुंब घरगुल अपार्टमेन्ट इथं राहतं. बाळाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा संतोष हा झोपला होता. मात्र झोपेतून उठत असताना संतोष हे हॉलमध्येच पडले. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. जखम मोठी असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यानच संतोष यांचा दुर्दैवी अंत झालाय.

संतोष बाळाजी घोसाळकर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून त्याचं वर 46 वर्ष आहे. जखमी अवस्थेतील संतोष यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी तत्काळ दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यानच संतोष घोसाळकर यांचा मृत्यू झाला. संतोष यांचा मृत्यू झाल्यानं घोसाळकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

काळजी घ्या!

दरम्यान, या घटनेमुळे आता झोपेतून उठताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो, हे अधोरेखित झालं आहे. त्यामुळे झोपेतून उठताना विशेष काळजी घेण्याची गरजही व्यक्त केली जाते आहे. विशेष म्हणजे झोपेतून उठताना थेट उभं राहतात आणि पाठीवर थेट वजन न देता बसावं. एका बाजूला कुशी होऊन मगच झोपलेल्या अवस्थेतून उठण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही तज्ज्ञ देतात.

संबंधित बातम्या :

बाबा, तुम्ही आई आणि धाकट्या बहिणीला का मारलंत? 89 वर्षीय निवृत्त लष्करी जवानाने घडाघडा कारणं सांगितली

एक दिवसाच्या बाळासह काकू कोवळ्या उन्हात बसली, मिनिटभर दुसऱ्या बाईकडे सोपवलं, आणि…

सांगलीतील विट्यात दोन चिमुरड्यांसह विवाहितेची आत्महत्या, विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले

बाळाला दूध पाजत असतानाच भरधाव कारने चिरडलं, मुंबईत कुठे घडलं पुन्हा हिट एन्ड रन?


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें