Thane : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाणेकरांना मोठे ‘गिफ्ट’, मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता ठाण्यातही..

इंधनावरील भार कमी व्हावा आणि अत्याधुनिक प्रणालीच्या बसेस वापरात याव्यात या अनुषंगाने हा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे.

Thane : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाणेकरांना मोठे 'गिफ्ट', मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता ठाण्यातही..
ठाणेकरांच्या सेवेत लवकरच ई-बस
राजेंद्र खराडे

|

Sep 19, 2022 | 9:35 PM

ठाणे : नाही म्हणले तरी राज्यात आता महापालिका निवडणुकांचे (Municipal Election) )वारे वाहू लागले आहेच. याची प्रचिती मुंबईतील तापलेले राजकारण पाहता येत असली तरी या निवडणुकांच्या तोंडावर  ठाणे महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.  कारण ठाणे महापालिकेने एका खासगी कंपनीला 123 ई-बस (E-Bus) तयार करण्याची ऑर्डर दिलेली आहे. या ई-बस ठाणेकरांच्या सेवेत येणार असून या बसच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देखील ओलेक्ट्रा आणि ईव्हीवायने स्थापन केलेल्या कन्सोर्टियम कंपनीला देण्यात आलेली आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर पाठोपाठ ही सेवा आता ठाणेकरांना देखील मिळणार आहे.

ठाणे महापालिकेने 123 ई-बसची ऑर्डर कन्सोर्टियम कंपनीला दिलेली आहे. या ई-बसेस ईव्हीवाय ट्रान्स ओलेक्ट्रा ग्रीनटेककडून या बसेस खरेदी करेल आणि 9 महिन्याच्या कालावधीत त्या वितरीत कराव्या लागणार आहेत. या संबधीचे कंत्राट नुकतेच ठाणे महापालिकने दिले आहे.

इंधनावरील भार कमी व्हावा आणि अत्याधुनिक प्रणालीच्या बसेस वापरात याव्यात या अनुषंगाने हा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे. त्यामुळे अल्पावधीतच ई-बस मधून ठाणेकरांना प्रवास शक्य होणार आहे. कन्सोर्टियम ही कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड आणि इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्थापीत केलेली आहे.

ठाणे महापालिकेकडून 123 ई-बसची ऑर्डर देण्यात आली असून 9 महिन्यात याची पूर्तता करावी लागणार आहे. यासाठी महापालिकेला 185 कोटी रुपये खर्ची करावे लागले आहेत.

राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर शहरात असलेल्या ई-बस देखील कन्सोर्टियम या कंपनीकडूनच घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राज्यात ई-बसने 3 कोटीपेक्षा अधिकचे अंतर पार केले आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट झाली आहे.

123 ई-बसपैकी 55 बस या 12 मीटरच्या आणि यामध्ये 45 एसी आणि 10 नॉन एसी असणार तर 68 बस 9 मीटरच्या त्यामध्ये 26 एसी आणि 42 नॉन एसी, तर 12 मीटरच्या बसेस या 200 किमीचा पल्ला गाठणार आहेत. यामध्ये 40 आसनक्षमता असणार आहे.

यापूर्वी मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये ही सेवा पुरवली गेली आहे. आता यामध्ये आणखी एका शहराची भर पडत असून ठाणेकरांनाही ही सेवा पुरवली जाणार असल्याचा आनंद होत असल्याचे कन्सोर्टियमचे अध्यक्ष के.व्ही. प्रदीप यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें