मध्यरात्री तरुणीचं फेसबुक लाईव्ह आणि सुसाईड ट्रायल, लातूरमध्ये खळबळ

लातूर : मध्यरात्री फेसबुकवर एका तरुणीने फेसबुक लाईव्ह केलं आणि आख्या लातूर शहराची धावपळ सुरु झाली. तिचे फेसबुक फॉलोअर्स आणि पोलिसांनी मिळून अखेर त्या तरुणीचे प्राण वाचविले. पण या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आणि मध्यरात्री वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. रात्रीचा एक वाजलेला होता, लोक गाढ झोपेत होते. तरुणाई सोशल मीडिया बंद करुन झोपण्याच्या तयारीत …

मध्यरात्री तरुणीचं फेसबुक लाईव्ह आणि सुसाईड ट्रायल, लातूरमध्ये खळबळ

लातूर : मध्यरात्री फेसबुकवर एका तरुणीने फेसबुक लाईव्ह केलं आणि आख्या लातूर शहराची धावपळ सुरु झाली. तिचे फेसबुक फॉलोअर्स आणि पोलिसांनी मिळून अखेर त्या तरुणीचे प्राण वाचविले. पण या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आणि मध्यरात्री वेगळाच प्रकार पाहायला मिळाला.

रात्रीचा एक वाजलेला होता, लोक गाढ झोपेत होते. तरुणाई सोशल मीडिया बंद करुन झोपण्याच्या तयारीत होती. तेवढ्यात एका तरुणीचं फेसबुक लाईव्ह सुरु झालं. आपण लाईव्ह आत्महत्या करत असल्याचं ती सांगत होती. हे ऐकून झोपेला निघालेले लातुरातील युजर्स खडबडून जागे झाले.

या तरुणीच्या फेसबुक मित्रांनी डोळ्यात प्राण आणून तिचं म्हणणं ऐकलं. ती सांगत होती, “मी खूप वैतागले आहे. मला काही लोक त्रास देत आहेत. मला एक जण मर असं वारंवार सांगतोय. त्यामुळे मी विष प्राशन केलं आहे”, असं ती फेसबुक लाईव्हद्वारे सांगत होती.

मुलीचा आवाज, बिघडत चाललेली प्रकृती आणि तिच्या हातातला विषारी औषधाचा ग्लास यामुळे आणखी खळबळ उडाली. फेसबुक फॉलोअर्सने सतर्कता दाखवली आणि त्या तरुणीचं घर शोधलं. तोपर्यंत पोलिसांनाही माहिती देण्यात आली. घराचा दरवाजा तोडून या तरुणीला वाचवण्यात आलं.

लोक या तरुणीच्या घरी पोहोचोपर्यंत ती बेशुद्ध पडली होती. तिला तातडीने लातूरच्या सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले. आता तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र तिच्या लाईव्ह आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामुळे लातुरातल्या शेकडो युजर्सची तारांबळ उडाली आणि याच युजर्समुळे ती आता बचावली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *