खासदार सुप्रिया सुळेंनी केलेली मागणी जितेंद्र आव्हाडांकडून अवघ्या 3 दिवसांत पूर्ण!

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांसाठी हॉस्टेलबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत जितेंद्र आव्हाड यांनी सुळे यांच्या मागणीची पुर्तता केली आहे.

खासदार सुप्रिया सुळेंनी केलेली मागणी जितेंद्र आव्हाडांकडून अवघ्या 3 दिवसांत पूर्ण!
सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील वर्कींग वुमन्ससाठी केलेली मागणी जितेंद्र आव्हाडांकडून पूर्ण
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 4:19 PM

मुंबई : मुंबईत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांसाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत ताडदेवमध्ये 1 हजार महिलांसाठी (वर्किंग वुमन्स) हॉस्टेल उभं करण्यात येणार आहे. तशी घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. तीन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांसाठी हॉस्टेलबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत जितेंद्र आव्हाड यांनी सुळे यांच्या मागणीची पुर्तता केली आहे. (A hostel for working women will be set up in Taddev, Jitendra Awhad responds to Supriya Sule’s demand)

सुप्रिया सुळे यांची मागणी

मुंबईतील वर्किंग वुमन्ससाटी हॉस्टेल उभं करण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी ट्विटरद्वारे केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत जितेंद्र आव्हाड यांना सूचना केली होती.

ताडदेवमध्ये वर्किंग वुमन्ससाठी हॉस्टेल उभारलं जाणार

त्यानंतर आज ताडदेवमध्ये 1 हजार वर्किंग वुमन्सना राहण्यासाठी हॉस्टेल उभं करत आहोत. येत्या दीड ते दोन वर्षात हॉस्टेल उभे करु. हे हॉस्टेल सर्व योनींनी सुसज्ज असेल असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. ‘म्हाडा’ कोरोना काळात कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार आहे. लोकांना वाचवण्यासाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी जे जे हवं ते करु, असं आव्हाड म्हणालेत.

‘म्हाडा’चे 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला

मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात राज्यासह देशभरातून हजारो रुग्ण येतात. त्यांच्यातील अनेकांना निवासाची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागते. पण आता ती वेळ येणार नाही. कारण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ‘म्हाडा’ने आपले 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय 25 मार्च रोजी घेतला आहे. तशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.

आव्हाड यांनी 25 मार्च रोजी टाटा रुग्णालयाचे आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी टाटा रुग्णालयापासून 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हाजीकासम चाळ परिसरातील म्हाडाचे 100 फ्लॅट्स टाटा रुग्णालयाला देत असल्याचं आव्हाड यांनी जाहीर केलं. दरम्यान, आव्हाड यांनी ही संकल्पना काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. त्यानंतर हा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

थँक्यू आव्हाडसाहेब, टाटा कॅन्सर सेंटरला म्हाडाकडून 100 फ्लॅट्स

केंद्राच्या पाया पडायला लागलं तरी ठीक, पण…. : जितेंद्र आव्हाड

A hostel for working women will be set up in Taddev, Jitendra Awhad responds to Supriya Sule’s demand

Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.