आलिशान वंदेभारतमध्ये मराठी पदार्थांची लज्जत – साबुदाणा खिचडी, झुणकाभाकर, थालीपीठ आणि सावजी चिकन

भारतीय रेल्वेची खानपान सेवा सांभाळणाऱ्या आयआरसीटीसीने वंदेभारतच्या प्रवाशांसाठी खास मराठमोळ्या डीशेसची मेजवाणीच ठेवली आहे. आलीशान वंदेभारतमध्ये मन तृप्त करणारे एकाहून एक लज्जतदार मराठी पदार्थ प्रवाशांना वाढले जाणार आहेत.

आलिशान वंदेभारतमध्ये मराठी पदार्थांची लज्जत - साबुदाणा खिचडी, झुणकाभाकर, थालीपीठ आणि सावजी चिकन
vandefood (1)Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 6:37 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 10 फेब्रुवारीला सीएसएमटी ( CSMT )  स्थानकातून दोन वंदेभारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर ( SOLAPUR ) आणि साईनगर-शिर्डी ( SAINAGAR-SHIRDI ) अशा दोन वंदेभारतचे ( Vande Bharat  ) उद्धाटन पंतप्रधानांच्या ( NarendraModi ) हस्ते होणार आहे. या दोन वंदेभारतच्या उद्गाटनामुळे राज्य अंतर्गत दोन वंदेभारत धावणारे महाराष्ट्र हे पहीले राज्य ठरणार आहे. या दोन आलिशान वंदेभारतच्या प्रवाशांसाठी  नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत लज्जतदार मराठी खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे.

महाराष्ट्राला आणखी दोन वंदेभारतची ( Vande Bharat  ) अनोखी भेट मिळाली आहे. मुंबई ते सोलापूर ( SOLAPUR ) आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदेभारतचे उद्घाटन येत्या दहा ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी ( NarendraModi ) यांच्या हस्ते होत आहे. या दोन गाड्यांमुळे मध्य रेल्वेला मिळालेल्या वंदेभारतची संख्या आता तीन झाली आहे. तर महाराष्ट्राला मिळालेल्या वंदेभारतची गाड्यांची संख्या चार झाली आहे. दर ताशी 180 किमीच्या वेगाने धावणाऱ्या या आलिशान वंदेभारतच्या प्रवाशांसाठी मराठमोळ्या खाद्यपदार्थांची अगदी मेजवाणीच आयोजित केली आहे.

आयआरसीटीसीचा मराठमोळा मेन्यू

भारतीय रेल्वेची खानपान सेवा सांभाळणाऱ्या आयआरसीटीसीने वंदेभारतच्या प्रवाशांसाठी निवडलेल्या संभाव्य डिशेस

सकाळचा नाश्ता 

सकाळच्या नाश्त्यात शेंगदाणा चिवडा, भडंगसह साबुदाणा-शेंगदाणा खिचडी , ज्वारीची भाकरी आणि बेसन पोळा आदी.

जेवणामध्ये शाकाहारींसाठी व्हेज शेंगदाणा पुलाव, किंवा वाटाणा पुलाव , भाकरी- आमटी, दाण्याची उसळ, झुणका तसेच मासांहारीकरीता चिकन सावजी, चिकन तांबडा रस्सा, चिकन कोल्हापुरी अशी ठसकेदार मेजवाणी असेल

सायंकाळचा नाश्ता

सायंकाळच्या नाश्त्यात साबुदाणा वडा, शेगावची कचोरी, कोथींबीर वडी, थालीपीठ, मल्टी ग्रेन भडंग, साबुदाणा वडा, बाकरवडी असा बंदोबस्त असेल..

प्रवाशांच्या जेवणात आलटून पालटून ज्वारीच्या भाकरी ऐवजी बाजरी आणि नाचणीची भाकरी मिळण्याचीही सुविधा देण्याची योजना असणार आहे. या मेन्यूची निवड अंतिम झाली नसून त्यात आवश्यकेनूसार बदलही होऊ शकतो असे आयआरसीटीसीने म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.