पाण्याने भरलेल्या विहिरीत आढळल्या तब्बल 11 चोरीच्या बाईक

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एकूण 11 बाईक पाण्याने भरलेल्या विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ परिसरात उडाली आहे. जिल्ह्यातील कळस गावातल हा बाईक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी बाईकचे पार्ट्स काढून या बाईक विहिरीत फेकल्याचं बोललं जात आहे. विहिरीतील 11 बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या असून विहिरीत आणखी मोटारसायकल असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या […]

पाण्याने भरलेल्या विहिरीत आढळल्या तब्बल 11 चोरीच्या बाईक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एकूण 11 बाईक पाण्याने भरलेल्या विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ परिसरात उडाली आहे. जिल्ह्यातील कळस गावातल हा बाईक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी बाईकचे पार्ट्स काढून या बाईक विहिरीत फेकल्याचं बोललं जात आहे. विहिरीतील 11 बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या असून विहिरीत आणखी मोटारसायकल असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या बाईक चोर टोळीचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांवर उभं राहिलं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

अकोले तालुक्यातील कळस गावातील ही घटना आहे. गावातील प्रवरा नदीच्या जवळ असणा-या पिण्याच्या पाण्याच्या जुन्या विहिरीत ऑईलचा तवंग आल्याचं पाहून नागरीकांनी पोलीसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस आल्यानंतर विहिरीत गळ टाकला असता त्यातून बाईक निघाली. हे पाहून गावकरीही थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे अशा एक ना दोन आत्तापर्यंत जवळपास अकरा बाईक विहिरीतून बाहेर काढल्या आहेत. विहिरीत पाणी जास्त असल्याने आता सक्शन पंप लावून पाणी बाहेर काढले जाणार आहे. त्यानंतर आणखी किती बाईक या विहिरीत आहे याची माहीती मिळू शकेल.

आत्तापर्यंत निघालेल्या या बाईक दिड दोन वर्षापूर्वी अकोले आणि संगमनेर तालुक्यातून चोरीला गेल्या होत्या. चोरांनी या गाड्यांचे काही पार्टस काढून घेतल्याच्या अवस्थेत असून बाईक विहिरीत टाकून दिल्या असल्याचा संशय पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. परिसरातील आणखी काही विहिरीत गाड्या आहे की काय याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र अशा प्रकारे गाड्या चोरून विहिरीत का टाकून दिल्या? हा प्रश्न पोलिंसासमोर निर्माण झाला आहे. या बाईक चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

यावेळी संगमनेर, अकोले या भागातील अनेकांनी ज्यांची गाडी चोरीला गेली त्यांनी विहिरीजवळ गर्दी केली होती. विहिरीतून निघालेल्या गाड्यांपैकी आपली गाडी आहे का याची खातरजमा करत आहेत.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.