मुलगी बघून परतत असताना भीषण अपघात, चालकासह एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

नागपूर -औरंगाबाद महामार्गावर कंटेनर आणि बोलेरो गाडीमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुलगी बघून परतत असताना भीषण अपघात, चालकासह एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

बुलडाणा : नागपूर -औरंगाबाद महामार्गावर कंटेनर आणि बोलेरो गाडीमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात मरण पावलेले सर्वजण औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर – औरंगाबाद महामार्गावर रात्री 1 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात या अपघातात मनोहर क्षिरसागर (70), मेघा मनोहर क्षिरसागर (35), नलिनी मनोहर क्षिरसागर (66), बोलेरो चालक सुगदेव नागरे (25) या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. क्षिरसागर कुटुंबीय हे वाशिममध्ये मुलासाठी मुलगी पाहायला गेले होते. मात्र परत असताना सिमेंटच्या कंटेनरमध्ये  बोलेरो गाडीला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, कंटेनरने बोलेरो गाडीला जवळपास 50 फूट फरफटत नेलं. यात गाडीचा संपूर्ण चुराडा झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तात्काळ मृत झालेल्या व्यक्तींना जेसीबी मशीनद्वार वर काढले. यानंतर हे सर्व जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. दरम्यान कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अद्याप फरार आहे. विशेष म्हणजे महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झाला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *