'क्राईम पेट्रोल' पाहून बॉयफ्रेंडवर अॅसिड हल्ला, नगरमधील तरुणीची कबुली

अहमदनगर : काही दिवसांपूर्वी नगरमध्ये झालेल्या Acid Attack प्रकरणी खळबळजनक खुलासा झालाय. या प्रकरणात अटक झालेल्या तरुणीने जो खुलासा केलाय, त्यातून पोलीसही चक्रावून गेले आहेत. प्रियकराचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर होतं, त्याचा राग मनात धरुन प्रेयसीने बॉयफ्रेंडवर Acid Attack केला. या हल्ल्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी तिने क्राईम पेट्रोल ही मालिका पाहिली. सोमवारी नगरच्या मनमाड रोडवरील प्रेमदान चौकातील तोरणा …

Acid Attack on boyfriend, ‘क्राईम पेट्रोल’ पाहून बॉयफ्रेंडवर अॅसिड हल्ला, नगरमधील तरुणीची कबुली

अहमदनगर : काही दिवसांपूर्वी नगरमध्ये झालेल्या Acid Attack प्रकरणी खळबळजनक खुलासा झालाय. या प्रकरणात अटक झालेल्या तरुणीने जो खुलासा केलाय, त्यातून पोलीसही चक्रावून गेले आहेत. प्रियकराचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर होतं, त्याचा राग मनात धरुन प्रेयसीने बॉयफ्रेंडवर Acid Attack केला. या हल्ल्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी तिने क्राईम पेट्रोल ही मालिका पाहिली.

सोमवारी नगरच्या मनमाड रोडवरील प्रेमदान चौकातील तोरणा हॉटेलमध्ये तरुणावर हल्ला झाला होता. हा हल्ला प्रेम प्रकरणातून झाल्याचं आता उघड झालंय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. बॉयफ्रेंडचा राग धरलेल्या प्रेयसीने बुरखा घालून बॉयफ्रेंडवर असिड फेकलं.

पोलिसांचा तपास सुरु असताना संशयित म्हणून पकडलेल्या युवतीने हल्ला केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला सायंकाळी अटक केली होती. बॉयफ्रेंडचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर होतं, हे सहन न झाल्याने मनात राग धरुन बॉयफ्रेंडवर बुरखा घालून हल्ल्याचा कट रचला, अशी कबुली तरुणीने दिली. या हल्ल्यासाठी असिड कुठून आणलं याचा तपास पोलीस करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *