मुख्यमंत्र्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांचं धाडसत्र, पालघरमध्ये एकाचवेळी 3 लग्नांवर कारवाई

मुख्यमंत्र्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांचं धाडसत्र, पालघरमध्ये एकाचवेळी 3 लग्नांवर कारवाई

पालघरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई केलीय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 22, 2021 | 6:28 PM

पालघर : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रण अलर्ट झाल्यात. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. त्यानंतर आता पालघरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई केलीय. पालघर जिल्हाधिकारी यांनी मोठी कारवाई करत एकाच रात्री तीन ठिकाणी लग्नसमारंभात धाड टाकली. यावेळी या लग्नांमध्ये 50 पेक्षा अधिक लोक समारंभासाठी उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली (Action against marriage in Palghar amid Corona).

वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अवास्तव गर्दी टाळायला हवी. त्यासाठी कोरोना उपाययोजना नियमांचे पालन होणं गरजेचं आहे. मात्र, पालघरमधील या लग्नांमध्ये या नियमांचं पालन न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी थेट कारवाईचा बडगा उगारलाय. विशेष म्हणजे या कारवाईत तीन नवरदेवांच्या पित्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे जिल्ह्यात एकच खडबळ उडाली.

कार्यक्रमात उपस्थितांची संख्या 50 पेक्षा अधिक असल्याने कारवाई

शिरगाव जलदेवी रिसॉर्ट, सातपाटी आणि उमरोळी बिरवाडी या 3 ठिकाणी लग्न समारंभ होत होते. मात्र, या कार्यक्रमात उपस्थितांची संख्या 50 पेक्षा अधिक असल्याने कारवाई करण्यात आली. तीन नवरदेव पित्यांसह रिसॉर्ट मालक, केटरर्स, डीजे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सातपटी आणि बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एका रात्रीत थेट 3 लग्नांच्या ठिकाणी धाडी

पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. जिल्हाधिकारी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन व पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांना आज रात्री सोबतीला घेऊन थेट 3 लग्नांच्या ठिकाणी धाडी टाकल्या. त्या ठिकाणी 500 हून अधिक लोग आढळल्याने जिल्हाधिकारी गुरसळ यांनी कारवाई केली. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी यांनी शिरगाव, सातपाटी, उमरोली बिरवाडी अशा तीन ठिकाणी असलेल्या लग्न समारंभाला भेटी दिल्या. त्या ठिकाणी अवास्तव गर्दी आणि कोरोना उपाय योजना नियमांचे पालन न केल्याने रिसॉर्ट मालक, केटरर्स, डीजे मालक यांच्यावर कारवाई केली. नवरदेवाच्या पित्यालाही ताब्यात घेण्यात आले. सातपाटी व बोईसर पोलीस ठाण्यात असे 2 विविध ठिकाणी नवरदेवाच्या 3 पित्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांन्वये गुन्हा दाखल केला गेलाय.

हेही वाचा :

Maharashtra Lockdown Updates : सर्व सामाजिक, धार्मिक, आंदोलनं, यात्रा यावर पूर्णपणे बंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Lockdown Updates : …तर आपल्याला लॉकडाऊन करावा लागेल : मुख्यमंत्री

वर्ध्यात लग्नकार्यांत संचारबंदीच ’विघ्न’, कुठं तारीख पुढे ढकलली, तर कुठं मोजक्या माणसांमध्ये ‘शुभ मंगलं’

व्हिडीओ पाहा :

Action against marriage in Palghar amid Corona

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें