कोरोनाविरुद्धच्या लढाईत 'या' अभिनेत्याचीही महापालिकेला साथ, 36 रुमचं संपूर्ण हॉटेल देत क्वारंन्टाईनसाठी मदत

कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी देशभरातील अनेक दिग्गज उद्योजक आणि कलाकार सरकारला आर्थिक मदत करत (Actor give hotel to bmc for quarantine) आहेत.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत 'या' अभिनेत्याचीही महापालिकेला साथ, 36 रुमचं संपूर्ण हॉटेल देत क्वारंन्टाईनसाठी मदत

मुंबई : कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी देशभरातील अनेक दिग्गज उद्योजक आणि कलाकार सरकारला आर्थिक मदत करत (Actor give hotel to bmc for quarantine) आहेत. नुकतेच अभिनेता शाहरुख खानने आपल्या ऑफिसची जागा मुंबई महापालिकेला देण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन तेथे क्वारंटाईन सेंटर तयार केले जाऊ शकते. शाहरुख नंतर आता अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीने आपले 36 रुमचे हॉटेल क्वारंटाईनसाठी मुंबई महापालिकेला दिले आहे. हे हॉटेल मुंबईच्या पवई (Actor give hotel to bmc for quarantine) विभागात आहे.

“मुंबईत माणसांची खूप गर्दी असते. येथे पर्यायी रुग्णालय आणि बेड नाहीत. जेव्हा पालिकेने आमच्याकडे मदतीचा हात मागितला. तेव्हा आम्ही पालिकेला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही आमचे हॉटेल क्वारंटाईन सुविधेसाठी पालिकेला दिले. संपूर्ण इमारत आणि रुममध्ये सतत औषध फवारणी केली जात आहे”, असं सचिन जोशी यांनी सांगितले.

याशिवाय जोशी यांनी आपल्या बिग ब्रदर फाऊंडेशनच्या माध्यमातून म्युनिसिपल कामगार आणि पोलीस यांच्यासाठी जेवणाचीही व्यवस्था केली आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात लॉकडाऊन केल्यामुळे सचिन जोशी सध्या दुबईमध्ये अडकले आहेत.

“आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही आमचे हॉटेल क्वारंटाईनसाठी पालिकेला दिले. हा माझ्या पतीचा निर्णय आहे आणि त्यांच्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. याशिवाय आम्ही गरजूंना जेवणही देत आहोत. आमची टीम गेल्या दोन आठवड्यापासूान हे काम करत आहे”, असं सचिन जोशी यांची पत्नी उर्वशी शर्माने सांगितले.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत राज्यात एक हजारपेक्षा अधिकांना कोरोना झाल्याचे समोर आलं आहे. तर देशात पाच हजारांपेक्षा अधिकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *