मिठी नदी विकास प्रकल्पाचा आदित्य ठाकरेंकडून आढावा, प्रलंबित कामे गतिमान करण्याचे आदेश

मिठी नदी विकास प्रकल्प, माहिम कॉजवे जोड रस्ता, सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडरस्ता यांसह इतर विविध विकासकामांचा आज मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला.

मिठी नदी विकास प्रकल्पाचा आदित्य ठाकरेंकडून आढावा, प्रलंबित कामे गतिमान करण्याचे आदेश
aaditya-Aditya
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 8:02 PM

मुंबई : मिठी नदी विकास प्रकल्प, माहिम कॉजवे जोड रस्ता, सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडरस्ता यांसह इतर विविध विकासकामांचा आज मंत्री आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन आढावा घेतला. (Aditya Thackeray Meeting With BMC, MMRDA Over Mithi River)

एमएमआरडीए कार्यालयात झालेल्या या बैठकीस एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, संजिव जयस्वाल, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मिठी नदीचे पुनुरुज्जीवन करणे तसेच नदीचा शाश्वत विकास करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. नदीच्या सभोवताली वॉकवे तयार करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. याची सुसाध्यता बघून माहिती सादर करावी, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

याबरोबरच सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानच्या लिंकरोडच्या कामासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. माहिम कॉजवे जोड रस्त्याच्या कामाचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. शहरातील कांदळवनांचे चांगल्या पद्धतीने जतन-संवर्धन व्हावे यासाठी त्यांचे वन विभागाला हस्तांतरण करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

एमएमआरडीएमार्फत राबविण्यात येत असलेल्या इतर प्रकल्पांचीही यावेळी माहिती घेण्यात आली. लवकरच पुन्हा बैठक घेऊन सर्व कामांना गती देण्यात येईल, असे आदित्य यांनी सांगितले. एमएमआरडीए, महापालिका आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन प्रलंबित कामे गतिमान करावीत, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

(Aditya Thackeray Meeting With BMC, MMRDA Over Mithi River)

संबंधित बातम्या

मुंबईत मिठी नदीखालून मेट्रो धावणार

आदित्य ठाकरेंकडून मुंबईतील पावसाळी परिस्थितीची पाहणी

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.