माझी पाटी कोरी होती तेव्हापासून माझं नातं, त्यामुळे चिंचवडची निवडणूक कशी लढवायची? अजित पवार यांनी संपूर्ण इतिहासच सांगितला

किरण बाळासाहेब ताजणे, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 07, 2023 | 2:32 PM

पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार यांनी विजय कसा होऊ शकतो याची गणितं मांडली आहे.

माझी पाटी कोरी होती तेव्हापासून माझं नातं, त्यामुळे चिंचवडची निवडणूक कशी लढवायची? अजित पवार यांनी संपूर्ण इतिहासच सांगितला
Image Credit source: Google

पिंपरी चिंचवड : आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाले आहे. भारतीय जनता पक्षाकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे (Nana Kate) यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे 2019 ला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली ते राहुल कलाटे (Rahul Kalate)  यांनीही निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली असून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) हे नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा विजय कसा शक्य आहे, राहुल काटे यांना किती मतं पडू शकतात हे सांगत असतांना चिंचवडचा इतिहासच अजित पवार यांनी सांगितला आहे.

अजित पवार यांनी राहुल कलाटे यांची माघार घेण्यासाठी प्रयत्न करू असे सांगत राहुल कलाटे यांना मागील वेळेला मिळालेली मत आत्ताही पडतील असे नाही, त्यापेक्षा कमी किंवा जास्तही पडतील असे म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

माझी पाटी कोरी होती तेव्हापासून माझं आणि पिंपरी चिंचवडचं नातं आहे. छोटी-छोटी गावं असल्यापासून ते शहराचा विकास होईपर्यन्त मी काम केलं आहे, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणूनही पिंपरी चिंचवडची ओळख राहिली आहे.

सर्वाधिक मताधिक्य मला या मतदार संघातून मिळाले होते, त्यामुळे कष्ट केले तर निवडणूक जिंकू शकतो, जुना कॉंग्रेसचा हा मतदार संघ आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे हा मतदार संघ आहे. शिवसेना ठाकरे गटाचीही मोठी ताकद आहे.

लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना सहानुभूती आहे असं तुम्हीच म्हणताय म्हणत अजित पवार यांनी चिंचवडमध्ये नाना काटे यांचा विजय निश्चित असल्याचे म्हंटले आहे. याशिवाय काटे हे महाविकास आघाडीचेच उमेदवार असल्याचे अजित पवार म्हणाले.

निवडणूक लाईटली घेतली तर निवडणूक सोपी नाही, पण जर कष्ट घेतले तर निवडणूक अवघड पण नाही, 1991 पासून मी इथून राजकीय सुरुवात केली आहे. देशात पहिल्या क्रमांकाची मतेही मला मिळाली होती.

या शहरात कुणी लक्ष घातलं आणि शहराचा कायापालट कुणी केला असे जुन्या लोकांना विचारा असं म्हणत अजित पवार यांनी शहराच्या विकासाचा दावा करत विकास कामांचा पाढा वाचत आमचाच विजय निश्चित असल्याचे म्हंटले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI