लढा मराठीचा : डॉ. कोतापल्ले, मधू मंगेश कर्णिक, ढाले-पाटलांसह दिग्गजांचं आंदोलन

मराठी भाषा सक्षमीकरण, मराठी शाळांसंबंधीच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील 24 संस्था एकत्र येऊन, मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु केलं आहे.

लढा मराठीचा : डॉ. कोतापल्ले, मधू मंगेश कर्णिक, ढाले-पाटलांसह दिग्गजांचं आंदोलन

मुंबई : मराठी भाषा सक्षमीकरण, मराठी शाळांसंबंधीच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील 24 संस्था एकत्र येऊन, मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु केलं आहे. मराठी भाषेतील अनेक साहित्यिक, विचारवंत एकत्र येऊन मराठी भाषेसाठी आंदोलन सुरु केलं आहे.

प्राध्यापक हरी नरके, साहित्यिक, डॉ नागनाथ कोतापल्ले,डॉ मधू मंगेश कर्णिक, डॉ कौतिकराव ढाले पाटील, डॉ लक्ष्मीकांत देशमुख, दादा गोरे, मिलिंद जोशी,अध्यक्ष मराठी साहित्य परिषद, अभिनेत्री वर्षा उसगावकर इत्यादींनी या आंदोलनात भाग घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विधानभवनात

दरम्यान, मराठी साहित्यिक आणि कलावंत हे दुपारी दीडच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विधानभवनाकडे रवाना झाले. या शिष्टमंडळात वर्षा उसगावकर, दीपक पवार, मधू मंगेश कर्णिक, नागनाथ कोत्तापल्ले, भालचंद्र मुणगेकर आणि इतर साहित्यिकांचा समावेश होता.

प्रमुख मागण्या

मराठी शाळांचं सक्षमीकरण, मराठी शाळातील शिक्षकांना वेतनेतर अनुदान देणे, मराठी शाळांची शिक्षक भरती तातडीने करणे, याशिवाय राज्य सरकारच्या  2012 च्या मास्टर प्लॅन नुसार ग्रामीण भागात जिथे मराठी शाळांची गरज आहे, अशा   259 शाळांचा प्रस्ताव अंतिम टप्यात रद्द झाल्याने अशा ठिकाणी या शाळा नव्याने सुरु करणे

सर्व बोर्डात 1 ते 12 इयत्तासाठी मराठी भाषा अनिवार्य करणे, या विविध मागणीसाठी हे सर्वजण एकत्र आले असून, आपल्या मागणीचे निवेदन ते मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.

मराठी भाषा टिकवण्यासाठी सगळ्या साहित्यिकांना एकत्र यावं लागतंय हे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी जमलेल्या मराठी साहित्यिकांनी दिल्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *