APMC election 2022 | बाजार समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, 5 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं निवडणूक कार्यक्रम केला जाहीर केला असून 5 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होणार आहे.

APMC election 2022 | बाजार समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, 5 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
ELECTION
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 8:49 PM

मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं निवडणूक कार्यक्रम केला जाहीर केला असून 5 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. राज्यातील एकूण 264 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत.

दोन टप्प्यात निवडणूक, 5 फेब्रुवारीला मतदान

मागील दीड वर्षापासून कोरोनाचे सावड कायम असल्यामुळे वेगवेगळ्या निवडणुका लांबल्या. सध्या मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. याच कारणामुळे आता वेगवेगळ्या निवडणुकांचे आयोजन करण्यात येत आहे. सध्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार राज्यात 264 बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यात निवडणूक होणार असून येत्या 5 फेब्रुवारीला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

मतदार याद्या तयार करून  देण्याची सूचना

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. आदेशानंतर आजपासून (22 ऑक्टोबर) मतदार याद्या तयार करून सहकारी निवडणूक प्राधिकरणाला देण्याची सूचना संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

सांगली जिल्हा बँकेची निवडणूक, 21 नोव्हेंबरला मतदान 

तर दुसरीकडे राज्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकादेखील होत आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 21 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बँकेच्या 21 संचालकांसाठी ही निवडणूक होणार आहे.

राजकीय आखाडा रंगणार, डावपेच आखण्यास सुरुवात

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यामुळे आता आगामी काळात राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. स्थानिक नेते राजकीय समिकरण जुळवण्यासाठी डावपचे आखण्यास सुरुवात करणार आहेत. तसेच राज्य पातळीवरच्या नेत्यांचेसुद्धा बाजार समितीच्या निवडणुकीकडे लक्ष असणार आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात राजकीय आखाडा चांगलाच रंगणार आहे.

इतर बातम्या :

मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा फोन, अजित पवार पुणे दौरा रद्द करुन थेट मुंबईच्या दिशेला रवाना

अनन्या पांडेची सलग 4 तास कसून चौकशी, समीर वानखेडे, महिला अधिकाऱ्याने विचारले प्रश्न, आता पुढे काय ?

मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक जाहीर, रविवारी लोकल उशिरा धावणार , काही फेऱ्या रद्द

(agricultural produce market committee apmc election 2022 program announced voting will be on 5 february 2022)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.