भांडण का केलं म्हणून तीन शिक्षकांकडून विद्यार्थाला मारहाण

अहमदनगर : आठवीत शिकणाऱ्या मुलाला तीन शिक्षकांनी बेदाम मारहाण केल्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात काष्टीच्या जनता विद्यालयातील शिक्षकांचा अमानुषपणा समोर आला आहे. आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थाला या तीन शिक्षकांनी मिळून बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. याप्रकरणी शाळा प्रशासनाकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन शाळेच्या …

भांडण का केलं म्हणून तीन शिक्षकांकडून विद्यार्थाला मारहाण

अहमदनगर : आठवीत शिकणाऱ्या मुलाला तीन शिक्षकांनी बेदाम मारहाण केल्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात काष्टीच्या जनता विद्यालयातील शिक्षकांचा अमानुषपणा समोर आला आहे. आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थाला या तीन शिक्षकांनी मिळून बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. याप्रकरणी शाळा प्रशासनाकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलं. या मारकुट्या शिक्षकांविरोधात मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

आठवीत शिकणारा चैतन्य माने या विद्यार्थ्याचं त्याच्याच वर्गातील काही मुलांबरोबर भांडण झालं. भांडण का केलं या कारणावरुन शाळेतील तीन शिक्षकांनी मिळून चैतन्यला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत चैतन्य गंभीर जखमी झाला आहे. यात चैतन्य अंगावर, पाठीवर जखम झाली आहे. ही शाळा रयत शिक्षण संस्थेची असून शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थाला मारहाण झाल्याची कबुली दिली आहे. तसेच संबंधित शिक्षकांचे अहवाल वरिष्ठांनकडे पाठवणार असल्याचंही मुख्याध्यापकांनी स्पष्ट केलं.

या प्रकरणी मुलाची आई रुपाली बाळासाहेब माने यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुलाला शिक्षकांनी शिवीगाळ करत निष्ठुरपणे मारहाण केल्याने संबंधितांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली. शाळेच्या मधल्या सुट्टीत त्याचे वर्गातील एका मुलासोबत भांडण झाले होते त्याचा राग येवून शिक्षक एच.पी.शिंदे, वर्गशिक्षक खामकर आणि ढवळे या तिघांनी आपल्या मुलास बेदम मारहाण केल्याचं या तक्रारीत सांगण्यात आलं आहे.

पोलिसांनी संबंधित शिक्षकांची चौकशी केली असून शाळा प्रशासनाला प्रशासकीय पातळीवर कारवाईचा अहवाल पाठवणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *