श्रीपाद छिंदमचा भाऊही अडचणीत

अहमदनगर : वादग्रस्त छिंदमचा भाऊ श्रीकांतने कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप विरोधी भाजप उमेदवाराने केला आहे. त्या प्रकरणी श्रीकांत छिंदम विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. श्रीकांत छिंदम हा अहमदनगर महापालिकेचा माजी उप महापौर श्रीपाद छिंदम याचा भाऊ आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या वादातून श्रीकांतने भाजप उमेदवार प्रदिप परदेशी यांच्या कार्यालयावर हल्ला चढवल्याची तक्रार तोफखाना पोलीस […]

श्रीपाद छिंदमचा भाऊही अडचणीत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

अहमदनगर : वादग्रस्त छिंदमचा भाऊ श्रीकांतने कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप विरोधी भाजप उमेदवाराने केला आहे. त्या प्रकरणी श्रीकांत छिंदम विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. श्रीकांत छिंदम हा अहमदनगर महापालिकेचा माजी उप महापौर श्रीपाद छिंदम याचा भाऊ आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या वादातून श्रीकांतने भाजप उमेदवार प्रदिप परदेशी यांच्या कार्यालयावर हल्ला चढवल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात देण्यात आली. प्रदिप परदेशी यांचे वडील अमरसिंग परदेशी यांनी ही तक्रार दोखल केली. श्रीकांत छिंदम याने जमावासह घर आणि कार्यालयात जाऊन सामानाची नासधूस केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

यानंतर प्रकरणानंतर प्रदिप परदेशी यांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

भाजपाचा माजी उप महापौर श्रीपाद छिंदम आणि त्याची पत्नी अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणूकिच्या रिंगणात आहेत. छिंदम प्रभाग क्रमांक 9 मधून तर पत्नी 13 मधून निवडणूक लढत आहेत. ते दोघेही निवडून यावे यासाठी आज सकाळी मतदान सुरु होण्याआधी छिंदम आणि भाऊ श्रीकांतने मतदान केंद्रावर जाऊन ब्राह्मणाच्या हातून ईव्हीएम मशीनची पूजा केली.

छिंदम याच्यासाठी वाद काही नवा नाही. काही महिन्यांपूर्वी महापालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याशी कामासंदर्भात फोनवरुन बोलताना, छिंदमने शिवराय आणि शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच छिंदमला अहमदनगर जिल्ह्यातून तडीपारही करण्यात आले होते.

अहमदनगर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अहमदनगरच्या पालिकेसाठी एकूण 68 जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील प्रत्येकी 4 याप्रमाणे 68 जागांसाठी 339 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 2 लाख 56 हजार 719 आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.