लग्नासाठी जाणाऱ्या कारचा टायर फुटून भीषण अपघात, आईसह चिमुकल्याचा मृत्यू

लग्नासाठी जाणाऱ्या कारचा टायर फुटून भीषण अपघात, आईसह चिमुकल्याचा मृत्यू

मुंबईहून गुजरातकडे लग्नासाठी जाणाऱ्या इको कारच्या मागचा टायर फुटून तोल गेल्याने हा अपघात झाला. (Ahmedabad National Highway Car Accident Two People died)

Namrata Patil

|

Jan 23, 2021 | 8:32 PM

मुंबई : अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. मुंबईहून गुजरातकडे लग्नासाठी जाणाऱ्या इको कारच्या मागचा टायर फुटून तोल गेल्याने हा अपघात झाला. (Ahmedabad National Highway Car Accident Two People died)

मुंबईतील माहिम परिसरात राहणारे शेख कुटुंब गुजरात वापी या ठिकाणी लग्नासाठी जात होते. त्यावेळी अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानीवरीजवळील सूसरी नदीच्या पुलावर इको कारचा टायर फुटला. यानंतर गाडीचा तोल गेल्याने गाडी पलटी झाली. दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की यात गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातात आईसह एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. या गाडीत लहान मुलांसह 10 जण होते.

त्यातील नाझनीन शेख (46), मुझेन शेख (1) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शाईन नाईक (46), आशिक अली (65), टूबा शेख(6), आतीफा शेख (9), जनाफ शेख(7), जोया शेख(6) आणि ड्रायव्हर अयान नाईक (29) हे सर्व जखमी झाले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Ahmedabad National Highway Car Accident Two People died)

संबंधित बातम्या : 

पोलिसांच्या मुलीही असुरक्षित, दुसरीही मुलगी झाल्याने सासरकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पगार न मिळाल्याने सटकली; ड्रायव्हरने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस पेटवल्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें