विरोधात कोण याचा विचार करत नाही, माझा विजय निश्चित : श्रीपाद छिंदम

पांडुरंग रायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने अखेर मतदान केलं. प्रभाग क्रमांक नऊमध्ये छिंदमने मतदानाचा हक्क बजावला. साधारण साडेचार वाजता छिंदमने मतदान केलं. मतदान केल्यावर छिंदमने मतदान केल्याची बोटाची शाईची निशाणी दाखवली. शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या छिंदमला तडीपार करण्यात आलं. मात्र शेवटच्या दोन तासात […]

विरोधात कोण याचा विचार करत नाही, माझा विजय निश्चित : श्रीपाद छिंदम
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

पांडुरंग रायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने अखेर मतदान केलं. प्रभाग क्रमांक नऊमध्ये छिंदमने मतदानाचा हक्क बजावला. साधारण साडेचार वाजता छिंदमने मतदान केलं. मतदान केल्यावर छिंदमने मतदान केल्याची बोटाची शाईची निशाणी दाखवली. शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या छिंदमला तडीपार करण्यात आलं. मात्र शेवटच्या दोन तासात छिंदमला मतदान करण्याची मुभा दिली होती.

मतदानानंतर बोलताना छिंदमने प्रशासनाने हद्दपार केले तरी मतदानाचा अधिकार दिल्याने आभार मानलेत. कोणाला संपवायचं आणि कोणाला राजकारणात जीवंत ठेवायचं हे मतदार ठरवत असल्याचं छिंदम म्हणाला. माझ्या विरोधात कोण उमेदवार आणि पक्ष माझ्या विरोधात आहे याची मी पर्वा करत नाही. मतदार हा राजा असून विजय निश्चित असल्याचा दावा छिंदमने केलाय.

शिवरायाबददल बेताल वक्तव्य केल्याने छिंदमच्या विरोधात राज्यभरात निदर्शने झाली होती. त्यातच यंदा तो सपत्नीक निवडणूक रिंगणात उतरलाय. मात्र छिंदम या मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवतोय. छिंदमच्या विरोधात भाजप, शिवसेना आणि आघाडीचे उमेदवार आहेत.

छिंदमच्या भावाकडून ईव्हीएमची पूजा

मतदानाला सकाळी 7.30 ला सुरुवात झाली. तर सकाळी मतदान सुरुवात होण्याआधीच माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदमने ईव्हीएमची पूजा केली. विशेष म्हणजे ब्राह्महणाच्या हातून ही पूजा करण्यात आली. छिंदम वार्ड क्रमांक 9 मधून अपक्ष उभा आहे, तर पत्नी 13 मधूम आपलं नशीब अजमावत आहे. तसेच छिंदमवर ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी कारवाई होणार आहे, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचं त्वरित निलंबित करणार असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं.

महापालिका निवडणुकीसाठी अहमदनगरमध्ये मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. गुन्हेगारी कारणांमुळे चर्चेत असेलल्या नगर महापालिकेच्या 68 जागांसाठी निकाल उद्या लागणार असून हजारो उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय. या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगरची जनता महापालिकेच्या सत्तेची चावी कुणाकडे देणार याचा निर्णय उद्या होणार आहे.

Non Stop LIVE Update
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.