हाती झाडू घेऊन बसस्थानक झाडलं, नव वधू-वराकडून नववर्षाचं अनोखं स्वागत

अहमदनगर: अहमदनगरला नव वधू-वराने बसस्थानक स्वच्छ करून  नववर्षाचे स्वागत केलं. विशेष म्हणजे दुपारी लग्न झाल्यावर नवदाम्पत्याने घरी न जाता थेट बस्थानक गाठले. नवरदेव रोहित जगताप आणि नवरी निशा पाठक यांनी हातात खराटा घेऊन, तारखापूर स्थानक स्वच्छ केलं. तर कोणत्याही प्रकारचा डीजे, बँड तसेच पार्टी न करता स्वच्छतेची वरात साजरी केली. या अभिनव उपक्रमाबद्दल नगरकरांनी नवं वर-वधूचं कौतुक …

, हाती झाडू घेऊन बसस्थानक झाडलं, नव वधू-वराकडून नववर्षाचं अनोखं स्वागत

अहमदनगर: अहमदनगरला नव वधू-वराने बसस्थानक स्वच्छ करून  नववर्षाचे स्वागत केलं. विशेष म्हणजे दुपारी लग्न झाल्यावर नवदाम्पत्याने घरी न जाता थेट बस्थानक गाठले. नवरदेव रोहित जगताप आणि नवरी निशा पाठक यांनी हातात खराटा घेऊन, तारखापूर स्थानक स्वच्छ केलं. तर कोणत्याही प्रकारचा डीजे, बँड तसेच पार्टी न करता स्वच्छतेची वरात साजरी केली. या अभिनव उपक्रमाबद्दल नगरकरांनी नवं वर-वधूचं कौतुक केलं.

नगरला आर्ट ऑफ लिव्हिंग आणि युवा चेतना फाऊंडेशन मार्फत गेल्या पाच वर्षांपासून नववर्षाच्या निमित्ताने शहरातील सर्व बसस्थानकं, स्वच्छतागृह, टॉयलेट स्वच्छ करण्यात येते. तसेच दुधाचेदेखील वाटप करण्यात येते. सामाजिक कार्यकर्ते अमर कळमकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येतो. त्यामुळे या उपक्रमात आपण सहभागी व्हावे असे रोहितने ठरविले. रोहितचं शिक्षण बी कॉमपर्यंत तर निशा डी फार्मसी झाली आहे.

“सर्व युवा पिढी पुढे आली तर नगर शहर स्वच्छ होण्यास मदत होईल. अस्वच्छतेमुळे दुर्गंधी होऊन रोगराई पसरते, त्यामुळे मी हा उपक्रम राबवण्याचे ठरविले” असं रोहितने सांगितलं.

, हाती झाडू घेऊन बसस्थानक झाडलं, नव वधू-वराकडून नववर्षाचं अनोखं स्वागत

दुसरीकडे निशा म्हणाली, “मी नेहमी बस्थानकावर धूळ पाहते, अनेकदा खूप कचरा पडलेला असतो त्याचा मला खूप त्रास व्हायचा. मात्र आज लग्न झाल्यावर मला माझ्या पतीने आपण स्वच्छता अभियान राबविणार असल्याचं सांगितलं. तर संध्याकाळी डीजे, बँड न लावता आपण स्वच्छतेची वरात काढून नविन वर्ष साजरं करूया असं ठरलं”.

त्यानुसार रोहित आणि निशाने घरी न जाता थेट नगरच्या माळीवाडा बस्थानक गाठलं आणि गाडीतून उतरल्यानंतर  थेट हातात खराटा घेऊन झाडायला सुरुवात केली. या नव वधू-वराला पाहून बस्थानकावरील प्रवासी आश्चर्यचकित झाले.

रोहित आणि निशाच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, या भावनेतून त्यांनी समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *