काका, मी माझी कला अशीच जपणार, सुंदर हस्ताक्षर असलेल्या तिसरीतील मुलीकडून जयंत पाटलांना पत्र

'जयंत काका, मी माझी कला अशीच जपणार' असं श्रेयाने पत्रात म्हटलं (shreya sajan letter Jayant Patil)  आहे.

काका, मी माझी कला अशीच जपणार, सुंदर हस्ताक्षर असलेल्या तिसरीतील मुलीकडून जयंत पाटलांना पत्र
Follow us
| Updated on: Mar 01, 2020 | 7:23 PM

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील सोनगाव जिल्हा परिषद शाळेतील तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या श्रेया सजन हिच्या हस्ताक्षराने सर्वांनाच भुरळ घातली (shreya sajan letter Jayant Patil)  होती. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही श्रेयाचं कौतुक करत तिला अभिनंदनाचं पत्र पाठवलं होतं. श्रेयानेही जयंत पाटील यांच्या पत्राला उत्तर देत ‘माझी कला मी अशीच जपणार’ असल्याचं म्हटलं आहे. श्रेयाचं हे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर शेअर केलं आहे.

आपल्या सुंदर हस्ताक्षरामुळे श्रेया गोरक्षनाथ सजन या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्र लिहून तिचे कौतुक केले होते. जयंत पाटील यांच्या या पत्राला श्रेयाने उत्तर दिलं आहे. ‘जयंत काका, मी माझी कला अशीच जपणार’ असं श्रेयाने पत्रात म्हटलं (shreya sajan letter Jayant Patil)  आहे.

“प्रिय जयंत काका,

यांस श्रेया सजन दिदीचा सप्रेम नमस्कार.

काका 6 तारखेला तुम्ही माझे अक्षर पाहिले आणि माझे अभिनंदन तसेच कौतुक केले. मला खूप आनंद झाला. मी माझ्या शाळेतील मैत्रिणींना सांगितले. मुंबईवरुन जयंतकाकांनी मला पत्र पाठवले. सर्वांना आनंद झाला. माझ्या आईबाबांना, आजीआजोबांना खूप आनंद झाला.

काका तुम्ही खूप कामात व्यस्त असताना मला पत्र लिहिले याबद्दल तुमचे मनापासून आभार . तुम्ही केलेल्या कौतुकामुळे मला यापुढेही सुंदर हस्ताक्षर काढण्याचे प्रोत्साहन मिळाले आहे. तुम्ही सांगितले त्याप्रमाणे मी माझी कला आणखी वाढवणार.

काका मी मोठी झाल्यावर माझ्या आईवडिलांबरोबर मुंबईला तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे. तुम्ही मला भेटाल अशी अपेक्षा बाळगते.

माझे पत्र मिळताच मला पत्राचे उत्तर पाठवा. मी तुमच्या पत्राची वाट पाहीन किंवा तुमच्या फेसबुकवर येण्याची वाट पाहीन.”

एका हस्ताक्षराच्या स्पर्धेनिमित्ताने सोनगावमधील कडूवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी श्रेया सोशल मीडियावर प्रसिद्घ झाली होती. श्रेयाचे कौतुक करणारे पत्र जयंत पाटील यांनी पाठवले होते. त्या पत्राला श्रेयाने अशाप्रकारे उत्तर दिलं आहे.

विशेष म्हणजे तिच्या या पत्रानंतर जयंत पाटील यांनीही तिला उत्तर दिलं आहे. “श्रेया, तुझे पत्र मिळाले. तू मोठी झाल्यावर आपण भेटूच. त्याआधी देखील तुला भेटायला आवडेल मला. तुझ्या भावी आयुष्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद,” असे ट्विट जयंत पाटील यांनी केलं (shreya sajan letter Jayant Patil)  आहे.

जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत श्रेयाने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यानंतर श्रेयाच्या वडीलांनी तिचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला. यावर नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलं आहे.

तिच्या वडीलांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओचं जयंत पाटील यांनीही कौतुक केलं आहे. जयंत पाटील यांनी तिचे हस्ताक्षर असलेले पान ट्विटरवर पोस्ट केलं आहे.  “प्रिय श्रेया, तुझे खूप खूप अभिनंदन! तुझे हस्ताक्षर स्पर्धेतील लिखाण सोशल मीडियावर पाहिले आणि तुझे खुप कौतुक वाटले. तुझे वळणदार आणि सुंदर असे हे हस्ताक्षर जरुर जप. तुझ्या भावी शैक्षणिक कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा!”, अशी पोस्टही जयंत पाटील यांनी ट्विटरवर केली (third std girl good handwriting) आहे.

संबंधित बातम्या : 

मोत्याच्या दाण्यांसारखं हस्ताक्षर सोशल मीडियावर व्हायरल, तिसरीतील मुलीचे जयंत पाटलांकडून कौतुक

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.