आधी ठाकरे, मग पाटील आणि आता अंतुले; नवी मुंबई विमानतळ नामांतरात एमआयएमची उडी

नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलेली असतानाच आता या वादात एमआयएमने उडी घेतली आहे. (aimim wants Navi Mumbai international airport to be named after a. r. antulay)

आधी ठाकरे, मग पाटील आणि आता अंतुले; नवी मुंबई विमानतळ नामांतरात एमआयएमची उडी
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 5:06 PM

नवीमुंबई: नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलेली असतानाच आता या वादात एमआयएमने उडी घेतली आहे. नवी मुंबई विमानतळाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचं नाव देण्याची मागणी एमआयएमने केली आहे. त्यामुळे आगामी काळात नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा वाद अधिकच पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (aimim wants Navi Mumbai international airport to be named after a. r. antulay)

एमआयएम विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हाजी शहानवाज खान यांनी ही मागणी केली आहे. खान यांनी आज नवी मुंबईतील विमानतळाला बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांचे नाव देण्याची मागणी केली. खान यांनी सिडकोच्या वरिष्ठ परिवहन अभियंता गीता पिल्लई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणीचं निवेदनही सादर केलं. जास्त गर्दी न होता आम्ही शांततापूर्वक ही मागणी केली आहे. याबाबत लेखीपत्र सुद्धा सिडकोला दिले आहे. सर्वच पक्ष यात राजकारण करत असून आम्ही कुणाच्या भावना न दुखवता अंतुले यांचे नाव विमानतळाला द्यावे, अशी मागणी केली आहे, असं हाजी शहानवाज खान यांनी सांगितलं.

जातीय रंग देण्याचा प्रयत्न?

एमआयएमने अंतुले यांच्या नावाची मागणी करून या वादाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे का? असा सवाल करण्यात आला असून हा जातीचा नाही तर मातीचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया एमआयएमकडून व्यक्त करण्यात आली. या आधी शिवसेनेने नवी मुंबई विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली होती. तर, भाजप नेते आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी केली होती.

ठाकूर काय म्हणाले?

नवी मुंबईतील कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला पाटील यांचं नाव देण्यात आलेलं नाही. नवी मुंबईची उभारणी करताना सिडकोने सक्तीने जमिनी संपादित केल्या होत्या. भूमिपुत्रांना या जमिनींचा योग्य मोबदला मिळावा म्हणून दि. बा. पाटील यांनी मोठा लढा उभारला होता. त्यामुळे या विनातळाला त्यांचे नाव देणं योग्य होईल. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचाही पाटलांच्या नावाला विरोध नसेल, असं सांगतानाच नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरात राजकारण होऊ नये, असं आवाहन प्रशांत ठाकूर यांनी केलं होतं. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जुंपलेली असतानाच आता रायगडमधून तिसंर नाव पुढे आल्याने विमानतळाला कुणाचे नाव दिलं जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (aimim wants Navi Mumbai international airport to be named after a. r. antulay)

संबंधित बातम्या:

ठाकरे की पाटील?; नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन शिवसेना विरुद्ध भाजप

MPL ची सूत्रं स्वीकारताच मिलिंद नार्वेकरांची बॅटिंग, ठाकरे-पवारांच्या फोटोसह होर्डिंगबाजी

चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देऊ नका; मनसेची भूमिका

(aimim wants Navi Mumbai international airport to be named after a. r. antulay)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.