महाड एमआयडीसीत वायुगळती; सात कर्मचारी बाधित

H2S गॅस प्रॉडक्शन विभागात गळती झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीय.

  • मेहबूब जमादार, टीव्ही 9 मराठी, रायगड
  • Published On - 23:48 PM, 21 Jan 2021
महाड एमआयडीसीत वायुगळती; सात कर्मचारी बाधित

रायगड: महाड एमआयडीसी येथील कंपनीत वायुगळती झाल्यानं आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. या वायुगळतीमुळे सात कर्मचारी बाधित झालेत. इंडो अमाईन्स कंपनीमध्ये संध्याकाळच्या सुमारास ही वायुगळती झाली असून, पाहता पाहता ती मोठ्या प्रमाणात पसरलीय. जखमींवरती महाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. H2S गॅस प्रॉडक्शन विभागात गळती झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. (Air Leak From Mahad MIDC; Seven Employees Interrupted)

महाड एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स लिमिटेड कारखान्यांमध्ये एच टू एस (हायड्रोजन सल्फाइड ) या मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या वायूची गळती झाल्याने कारखान्यातील सात कामगार बाधित झाल्याची घटना गुरुवार 21 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी उशिरा घडली. याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार वरील कारखान्यातील एच टू एस या वायूच्या गळतीमुळे या ठिकाणी काम करणारे सात कामगार बाधित झाले असून, या कामगारांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र या कामगारांना महाड शहरातील देशमुख हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचाराकरिता ठेवण्यात आले आहेत. उपचारानंतर कामगारांची प्रकृती स्थिर आहे.

सध्या यंत्रणांना वायुगळती थांबविण्यात यश

सध्या यंत्रणांना वायुगळती थांबविण्यात यश आले असून, वायुगळती नेमकी कशामुळे झाली, याचा खुलासा कंपनी व्यवस्थापनामार्फत करण्यात आलेला नाही. या कारखान्यात यापूर्वीदेखील अनेक अपघात होऊन कामगार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

महाड एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स कंपनीतील वायुगळतीमुळे 7 कर्मचारी बाधित

घटनेचे गांभीर्य ओळखून महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे यांनी उपचार सुरू असलेल्या कामगारांच्या प्रकृतीची विचारपूस करीत रुग्णालयात तसेच घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. महाड एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स कंपनीतील वायुगळतीमुळे बाधित झालेले कामगार उत्तम किसन पवार (वय 49), तेजस विजय चाळके (वय 25), जयराम चंद्रकांत चौधरी (वय 25), पंकज कुमार सोहम महातो (वय 25), पप्पू कमल महातो (वय 25), रजनीकांत नायर (वय 34), दत्तात्रय रावसाहेब कोल्हे (वय 39), यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

Bhandara Hospital Fire : भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात अखेर मोठी कारवाई, सिव्हिल सर्जनसह 6 जणांचं निलंबन

Serum Institute Fire Live | कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग, पाच जणांचा मृत्यू

Air Leak From Mahad MIDC; Seven Employees Interrupted