आधी रोहित पवारांवर 30 जेसीबीतून गुलाल, आता अजित पवारांवर पुष्पवृष्टीसाठी हेलिकॉप्टर सज्ज!

अजित पवार हे राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. अजित पवारांनी भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा तब्बल 1 लाख 65 हजार मतांनी पराभव केला. राज्यातील हा सर्वात मोठा विजय ठरला.

Ajit Pawar Baramati felicitation, आधी रोहित पवारांवर 30 जेसीबीतून गुलाल, आता अजित पवारांवर पुष्पवृष्टीसाठी हेलिकॉप्टर सज्ज!

बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज बारामतीत येत आहेत. अजित पवार यांच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे.  दुपारी तीन वाजता बारामती शहरातून अजित पवार (Ajit Pawar Baramati felicitation) यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातील शारदा प्रांगणात नागरी सत्कार होणार आहे. यावेळी अजित पवारांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी (Ajit Pawar Baramati felicitation) होणार आहे.

बारामतीतील अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाच्या सदस्यांनी वर्गणी जमा करुन अजित पवार यांच्या मिरवणुकीवेळी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार हे राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. अजित पवारांनी भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा तब्बल 1 लाख 65 हजार मतांनी पराभव केला. राज्यातील हा सर्वात मोठा विजय ठरला.

अजित पवारांच्या या सर्वात मोठ्या विजयानंतर त्यांच्या बारामतीत सेलिब्रेशनही जंगी होणार आहे. अजित पवारांचे पुतणे रोहित पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले, त्यावेळी तब्बल 30 जेसीबीवरुन गुलाल उधळून त्यांची मिरवणूक निघाली होती.

आता अजित पवारांची मिरवणूक आहे म्हटल्यावर, सेलिब्रेशनही त्याच पद्धतीने होणार आहे. अजित पवारांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. अजित पवार हे ठाकरे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारुन कामकाजालाही सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणूक निकाल ते ठाकरे सरकारच्या कामकाजाला सुरुवात, या दरम्यान महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या.

अजित पवारांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यांनी तीन दिवसातच राजीनामा दिला. त्यानंतर बरंच राजकीय नाट्य रंगल्यानंतर, महाराष्ट्रात 28 नोव्हेंबरला ठाकरे सरकार सत्तेवर आलं. मात्र त्यावेळी अजित पवार यांच्याकडे कोणतंही मंत्रिपद नव्हतं. 30 डिसेंबरला झालेल्या पहिल्या विस्तारामध्ये  अजित पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

संबंधित बातम्या  

रोहित पवारांची भव्य विजयी मिरवणूक, 30 जेसीबीतून गुलालाची उधळण 

30 जेसीबीवरुन गुलालाच्या उधळणीवर रोहित पवारांची फेसबुक पोस्ट 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *