अजितदादा माझे खास मित्र, मतभेद तर होणारच : उदयनराजे

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. राजवड्यापासून शक्तीप्रदर्शन करुन त्यांनी अर्ज भरला. उदयनराजेंसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, आमदार शिवेंद्रसिंहराजे राजे भोसलेंसह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांनी उदयनराजेंशी संवाद साधला. यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी माझ्यावर दहशतीचा बिनबुडाचा …

अजितदादा माझे खास मित्र, मतभेद तर होणारच : उदयनराजे

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. राजवड्यापासून शक्तीप्रदर्शन करुन त्यांनी अर्ज भरला. उदयनराजेंसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, आमदार शिवेंद्रसिंहराजे राजे भोसलेंसह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.

यावेळी आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांनी उदयनराजेंशी संवाद साधला. यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी माझ्यावर दहशतीचा बिनबुडाचा आरोप करत असल्याचा आरोप केला. तर विकास ही ऑन गोईंग प्रक्रिया असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर अजितदादा माझे खास मित्र आहेत, मतभेद तर होणारच. मात्र मतभेदांमुळे प्रेम वाढत असल्याचं उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय.

नमाजला भाषण रोखलं

उदयनराजे भोसले यांचं भाषण सुरु झालं त्यावेळी दुपारचं नमाज सुरु झालं. जोहारचं नमाज सुरु झाल्याने उदयनराजेंनी भाषण रोखलं. हे नमाज झाल्यानंतर उदयनराजेंनी आपली बँटिंग सुरु केली.

मोदींवर हल्लाबोल

पाच वर्षपूर्वी ज्यांना बहुमत दिले, त्यांनी मन की बात करुन करुन अभिनय केला. मात्र काहीच पदरात पडले नाही, दिशाभूल केली, असा आरोप उदयनराजेंनी मोदींवर केला.

तळागाळातील जनता गाळात

बहुमत मिळाल्यावर विसर पडला. तळागाळातील जनता आणखी गाळात गेली. 15 लाख मिळाले नाहीत. मात्र नोटबंदीत पैसे काढून घेतले. अडीच कोटी नोकरी दिली नाही. मात्र बेरोजगार झाले, असे टोमणे उदयनराजेंननी लगावले.

देशापेक्षा उद्योजक मोठा कसा?

या सरकारने भिकेला लावलं,आपण आता विचार केला पाहिजे, पाच वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकरी राजा असून आता जन की बात सुनावली पाहिजे.  ब्रिटिश ईस्ट कंपनीसारखं छाटछूट कंपानीने राज्य केलं. नावापुरती लोकशाही असून हुकूमशाही सुरु आहे. ठराविक उद्योगपतींना अधिकार दिले. ईस्ट इंडिया कंपनीसारखी बिजनेस कंपनी निर्माण केली,देशापेक्षा उद्योजक मोठा कसा? उद्योजक उद्या नद्या विकतील, मग त्यांच्याकडून पाणी विकत घ्यायचं का, असा सवाल उदयनराजेंनी विचारला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *