“शरद पवारांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे फक्त थापा”, अजित पवार नेमकं काय म्हणाले?

शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी शरद पवारांच्या या संकेतावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांचे ते संकेत या केवळ थापा असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

शरद पवारांचे 'ते' वक्तव्य म्हणजे फक्त थापा, अजित पवार नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 8:02 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सांगलीच्या इस्लामपूर येथील सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना राज्याचा मुख्यमंत्री करण्याबाबतचे संकेत दिले. त्यांच्या या संकेतांवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “इस्लामपूर येथे सभा झाली आणि वरिष्ठांनी सांगितले इथे मुख्यमंत्री पद येणार. या साफ थापा आहेत. ज्या गावच्या भाबळी त्या गावच्या बोरी. 2004 साली राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असताना देखील चार खाती जादा घेऊन काँग्रेसचा मुख्यमंत्री केला. जेव्हा जास्त जागा घेऊन मुख्यमंत्री पद घेईना, मग आता कसे रे घेणार? कारे लबाड घराचे आवताना जेवल्याशिवाय खरं नाही, त्यामुळे ते सगळे खोटं आहे”, असं अजित पवार म्हणाले. “निसर्गाचा एक नियम आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीला दाबण्याचा प्रयत्न कराल ती गोष्ट तेवढ्यात ताकतीने उसळून येते. कोणाचं लुबाडून घ्यायचं नसतं. आम्ही कुणाची कारखाने घेतली नाही ,कुणाचे उभे घेतले किंवा त्यात भर घातली”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी यावेळी जयंत पाटील यांच्याकडून लाडकी बहीण योजनेवरुन केलेल्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली. “लाडकी बहीण योजनेतून महिलांना पैसे देण्याचे काम केले. आम्ही त्या ठिकाणी कोणाचा करेक्ट कार्यक्रम करत नाही. करेक्ट कार्यक्रमाने माझ्या माय माऊलींना पैसे मिळणार नाहीत. करेक्ट कार्यक्रमाने माझ्या महिला-भगिनींना नोकरी मिळणार नाही. सांगायला खूप सोपं आहे. करेक्ट कार्यक्रम करतो, करेक्ट कार्यक्रम करायचं कोणाच्याही हातात नाही. करेक्ट कार्यक्रम करायचे जनतेच्या हातात आहे. लाडकी बहीण योजना बंद करणार, असे म्हणतात. ती योजना काय तुमच्या काकाची आहे का?”, असा सवाल अजित पवार यांनी केला.

‘घटना घडतात, भांड्याला भांडे लागतात’

“योजना सगळी विचार करून दिली आहे. मी 10 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केलं आहे. आजही अर्थमंत्री आहे. अल्पसंख्याक समाजात नेरिटीव्ही सेट करण्याचा प्रयत्न केला गेला. पण आम्ही सगळ्यांचे आहोत. घटना घडतात. भांड्याला भांडे लागतात, पण त्यांचा संसार पुन्हा कसं उभं करायचं, यासाठी आम्ही काम करतोय. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही काम करतोय. योजना चालू ठेवायचं असेल तर कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळचं बटन दाबा”, असं अजित पवार म्हणाले.

“वाळवा तालुका हा क्रांतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जाती-जातीत तेढ निर्माण करून कुठलाही देश, राज्य आणि जिल्हा पुढे जाऊ शकत नाही. घडाळ्याची परंपरा मोडीत काढायची नाही. त्यामुळे घड्याळला मतदान करायचं. आम्ही सत्तेला हपापलेलो नाही. ताम्रपट घेऊन कोणी आले नाही”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...
कुर्ल्यात बस ड्रायव्हर मद्यधुंद की ब्रेक फेल? संतप्त जमावानं बेदम धुतल
कुर्ल्यात बस ड्रायव्हर मद्यधुंद की ब्रेक फेल? संतप्त जमावानं बेदम धुतल.
एकनाथ शिंदे अडूनच... गृहखात्यासाठी शिंदे-फडणवीस यांच्यात रस्सीखेच
एकनाथ शिंदे अडूनच... गृहखात्यासाठी शिंदे-फडणवीस यांच्यात रस्सीखेच.
'योग्य वेळी योग्य निर्णय...', जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय?
'योग्य वेळी योग्य निर्णय...', जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय?.
कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार?आदिती तटकरेंनी क्लिअर सांगितले
कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार?आदिती तटकरेंनी क्लिअर सांगितले.
मारकडवाडीचा मुद्दा दिल्लीपर्यंत अन् विधानसभेतही रंगले सवाल-जवाब
मारकडवाडीचा मुद्दा दिल्लीपर्यंत अन् विधानसभेतही रंगले सवाल-जवाब.
Kurla Accident : ज्या बसने झाला जीवघेणा अपघात, त्या बसची अवस्था काय ?
Kurla Accident : ज्या बसने झाला जीवघेणा अपघात, त्या बसची अवस्था काय ?.
ड्रायव्हरला बस चालवण्याचा नव्हता अनुभव, तपासातून धक्कादायक माहिती समोर
ड्रायव्हरला बस चालवण्याचा नव्हता अनुभव, तपासातून धक्कादायक माहिती समोर.
कुर्ला बस अपघाताने मुंबई हादरली, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
कुर्ला बस अपघाताने मुंबई हादरली, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना पत्र
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना पत्र.