“मला मुख्यमंत्रिपद द्या…” अजित पवारांनी स्पष्टच केली मागणी, विमानतळावर अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय घडलं?

मुंबई विमानतळावर अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा बोलून दाखवली.

मला मुख्यमंत्रिपद द्या... अजित पवारांनी स्पष्टच केली मागणी, विमानतळावर अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय घडलं?
अमित शाह, अजित पवार
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 9:42 AM

Ajit Pawar Mahayuti CM Face : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगणार आहे. त्यासोबतच सध्या या दोन्हीही युतींमधील घटकपक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा बोलून दाखवली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यापुढे अजित पवारांनी हा प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे. ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे नुकतेच दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी अमित शाह यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले होते. त्यासोबतच अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठीही गेले होते. त्यापूर्वी अमित शाह यांनी सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान अजित पवार हे अनुपस्थितीत होते. त्यामुळे चर्चाना उधाण आले होते. त्यातच आता ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवारांनी अमित शाह हे पुन्हा दिल्लीकडे होण्यासाठी रवाना होत असताना मुंबई विमानतळावर त्यांची भेट घेतली. यावेळी मुंबई विमानतळावर अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा बोलून दाखवली. बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या, असे अजित पवार म्हणाले.

“महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे. राज्यात बिहार पॅटर्न राबवावा”, असा प्रस्ताव अजित पवारांनी अमित शाह यांच्यापुढे ठेवला. यावेळी अजित पवार आणि अमित शाह यांच्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा ठोकलेल्या जागांबाबतही चर्चा झाली.

विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपाबाबत काय ठरलं?

गेल्या काही दिवसांपासून विधानसभेच्या जागावाटपाबद्द विविध चर्चा सुरु आहेत. त्यातच आता महायुतीत जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय झाल्याचे बोललं जात आहे. यात भाजप 288 पैकी जवळपास 150 जागा लढवू शकते. तर अजित पवार गटाला 70 जागा मिळू शकतात, असे बोललं जात आहे. मात्र काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे आम्ही या जागा सोडणार नाही. याशिवाय महाविकासाआघाडीच्या काळातील काँग्रेसच्या वाट्याच्या 10 ते 12 जागाही आम्हाला द्या, अशीही मागणी करण्यात आली.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.