अजित पवारांकडून सकाळी मंगल कार्यालयाचं आणि दुपारी मॅटर्निटी हॉस्पिटलचं उद्घाटन

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणात कधी आक्रमता दिसते.. तर कधी विनोदीपणा.. अनेक कार्यकर्ते त्यांच्या मूडचा अंदाज हा त्यांच्या भाषणावरुन बांधतात.. शुक्रवारी बारामतीत सकाळी 8 वाजल्यापासून दुपारपर्यंत अजित पवार यांनी तब्बल 8 कार्यक्रमांना हजेरी लावली. या कार्यक्रमांमध्ये तितक्याच हलक्याफुलक्या विनोदांनी अजित पवारांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. एका हॉस्पिटलच्या कार्यक्रमात आगळ्यावेगळ्या …

अजित पवारांकडून सकाळी मंगल कार्यालयाचं आणि दुपारी मॅटर्निटी हॉस्पिटलचं उद्घाटन

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणात कधी आक्रमता दिसते.. तर कधी विनोदीपणा.. अनेक कार्यकर्ते त्यांच्या मूडचा अंदाज हा त्यांच्या भाषणावरुन बांधतात.. शुक्रवारी बारामतीत सकाळी 8 वाजल्यापासून दुपारपर्यंत अजित पवार यांनी तब्बल 8 कार्यक्रमांना हजेरी लावली. या कार्यक्रमांमध्ये तितक्याच हलक्याफुलक्या विनोदांनी अजित पवारांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

एका हॉस्पिटलच्या कार्यक्रमात आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देत अजितदादांनी कार्यक्रमात रंगत आणली. सकाळी आपण मंगल कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात या ठिकाणी युवक-युवतींची धडाक्यात लग्न व्हावीत अशा शुभेच्छा दिल्यात.. आता मात्र त्या मंगल कार्यालयातील लग्न झालेल्या जोडप्यांना चांगलं बाळ व्हावं आणि ते या हॉस्पिटलमध्ये जन्माला येऊन डॉक्टरांना भरभरुन आशीर्वाद मिळावेत अशा शुभेच्छा देतो, असं म्हणत अजित पवार यांनी उपस्थितांना हास्यात बुडवलं.

बारामती शहरातील देशमुख मॅटर्निटी हॉस्पिटलचं उद्घाटन अजित पवार आणि त्यांच्या पत्नी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अजितदादांनी आपल्या खास अंदाजात सुरुवात केली. ते म्हणाले, आज सकाळी आपल्या हस्ते एका मंगल कार्यालयाचं उद्घाटन झालं. तिथे आपण बारामती आणि परिसरातल्या युवक-युवतींची लग्न धडाक्यात व्हावीत या शुभेच्छा दिल्या. आता मॅटर्निटी हॉस्पिटलचं उद्घाटन करताना त्या मंगल कार्यालयातील कार्यालयात लग्न होणाऱ्या जोडप्यांना बाळ चांगलं व्हावं आणि ते याच हॉस्पीटलमध्ये जन्माला यावं, बाळ-बाळंतीण दोघांची प्रकृती उत्तम रहावी आणि डॉक्टरांना भरभरुन आशीर्वाद मिळावेत अशा आपल्या शुभेच्छा आहेत, त्यांच्या या आगळ्यावेगळ्या शुभेच्छांना उपस्थितांनी टाळ्या वाजवत मनमुराद दाद दिली.

आपण हॉस्पिटलची पाहणी करत असताना डॉक्टरांचे वडील भेटले. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते हे आपले अत्यंत गुणी आणि चांगला विद्यार्थी असल्याचं आपल्याला सांगितलं. जिल्हा परिषद अध्यक्षांना आपण लहानपणापासून बघतोय तर ते गुणी आणि चांगले कसे? असं अजित पवारांनी सांगताच व्यासपीठावर बसलेल्या विश्वास देवकाते यांनी दादा, आता जाऊ द्या काय आता..असं म्हटलं.. त्याचाच धागा पकडत जे पटत नाही ते कसं सहन करु, तुम्हाला माहितीये ना मी स्पष्ट बोलतो, असं म्हणत अजित पवार यांनी आमच्या पक्षाने एका गुणी विद्यार्थ्याला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलंय, याचं समाधान असल्याचं आणि आज त्याची पावती मिळाल्याचं सांगितलं. हे बोलतानाच आता तरी चांगलं बोललो की नाही असं विचारायलाही ते विसरले नाहीत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *