Raj Thackeray : ओवैसी बोकडांनी महाराष्ट्रात येऊन बडबडू नये, राज ठाकरेंवर निशाणा साधल्यावर मनसेचा पलटवार

Raj Thackeray : ओवैसी बोकडांनी महाराष्ट्रात येऊन बडबडू नये, राज ठाकरेंवर निशाणा साधल्यावर मनसेचा पलटवार
ओवैसी बोकडांनी महाराष्ट्रात येऊन बडबडू नये, राज ठाकरेंवर निशाणा साधल्यावर मनसेचा पलटवार
Image Credit source: tv9

शिवरायांच्या महाराष्ट्रात ही निजामाची औलाद येऊन औगंगजेबाच्या कबरीवर दर्शन घ्यायला जाते नेमक महाराष्ट्र सरकारला काय पाहिजे? कोणाच्या आशीर्वादावने हे चालल आहे, राज ठाकरे यांच्य़ावर अटी लावायच्या आणि ओवीसीला मोकाट सोडल आहे. असा पलटवार मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे.

दादासाहेब कारंडे

|

May 12, 2022 | 11:36 PM

मुंबई : आज औरंगाबादेत पुन्हा राजकारणाचा माहौल गरमागर्मीचा झाला होता. कारण एसआयएमचे आमदार अकबरुद्दीन औवेसी आज औरंगाबद (Aurangabad MNS)दौऱ्यावर होते. त्यांनी औरंगाबादेत दाखल होत एका शाळेचं उद्घाटन केले. मात्र इतरही घडामोडींवर जहरी टीका केली. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकलेल्या विषयावरून तर जोरदार टीका झाली. मात्र आणखी एका मुद्द्यावरून आता त्यांच्यावर मनसेचे पलटवार होऊ लागले आहेत. कारण औरंगाबादेतल्या भाषणात अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी राज ठाकरेंवरही (Raj Thackeray) जोरदार निशाणा साधला होता. त्यामुळे आता मनसे नेते गजानन काळे यांनी ओवैसींना थेट बोकडाची उपमा दिली आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात ही निजामाची औलाद येऊन औगंगजेबाच्या कबरीवर दर्शन घ्यायला जाते नेमक महाराष्ट्र सरकारला काय पाहिजे? कोणाच्या आशीर्वादावने हे चालल आहे, राज ठाकरे यांच्य़ावर अटी लावायच्या आणि ओवीसीला मोकाट सोडल आहे. असा पलटवार मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे.

मनसेचा कडकडीत इशारा

तसेच कोण सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहे. ओवीसीला महाराष्ट्र सरकारने व्यसन घालावे नाहीतर त्याला कशी व्यसन घालायची हे मनसेला माहिती आहे, असा इशाराही मनसे नेते गजानन काळे यांनी दिला आहे. तसेच अकबरुद्दीन ओवैसी यांच्या राज ठाकरेंवरील औरंगाबादेतले टिकेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत. हैदराबादहून काही कुत्रे आज इथे भुंकण्यासाठी आले होते म्हणत मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाणा साधला आहे. ओवैसींना औरंगजेबाची कबर दिसली मग 17 लाख लोकांचा पाण्याचा प्रश्न दिसला नाही? असा सवालही मनसेकडून करण्यात आलाय. त्यामुळे यावरून पुन्हा नवा वाद सुरू झाला आहे.

ओवैसी नेमके काय म्हणाले?

आज अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरे यांच्या वरती अप्रत्यक्ष टीका करताना राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. काणी भुंकत असतात त्यांना भूक उद्या सिंहाचा काम आहे शांतपणे निघून जाणे. तुम्ही पण त्याच्यावरती हसत हसत निघून जा. अशा शब्दात अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न खपपूस टीका केली होती. तर दुसऱ्या बाजूला मी त्याच्यावर टीका काय करू मी त्याच्यावर टीका करावी तेवढी त्याची औकात नाही. माझा खासदार आहे. ते बेघर आहेत, त्यांच्यावर मी काय बोलू असेही ते म्हणाले होते. त्यावरूनच आता मनसे आक्रमक झाली आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें