अकोला जिल्ह्यात कोसळधार, विक्रमी पावसाची नोंद थेट जागतिक पातळीवर

अकोल्यात गुरुवारी 22 जुलैला 24 तासात 184.8 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जगातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या यादीत अकोला जिल्ह्याचे नाव हे आठव्या क्रमांकावर आहे. 

अकोला जिल्ह्यात कोसळधार, विक्रमी पावसाची नोंद थेट जागतिक पातळीवर
प्रातिनिधिक फोटो

अकोला : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून अनेक भागात ढगफुटीसदृश पाऊस कोसळत आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड भागात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. तर काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या धुवाँधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अकोला जिल्ह्यात 22 जुलैला कोसळलेल्या पावसाची नोंद ही जागतिक पातळीवर करण्यात आली आहे. अकोल्यात गुरुवारी 22 जुलैला 24 तासात 184.8 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जगातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या यादीत अकोला जिल्ह्याचे नाव हे आठव्या क्रमांकावर आहे.

हजारो गावांचा संपर्क तुटला

अकोल्यात गेल्या आठवड्याभरापासून तुफान पाऊस पडत आहे. गुरुवारी 22 जुलैला पडलेल्या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात हाहा:कार पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. अकोला शहरातील कौलखेड, खडकी, डाबकी रोड, जुनेशहर, शिवसेना वसाहत या भागात पावसाच्या पाण्याने थैमान घातले होते. या संपूर्ण भागात पूर परिस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे या ठिकाणी 5 ते 8 फुटांपर्यंत पाणी साचले होते. तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले. फक्त काही ठिकाणी नव्हे तर संपूर्ण अकोल्यात हीच परिस्थिती पाहायला मिळाली.

अकोला जिल्ह्यात अनेक भागातील नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे हजारो गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे. यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.

अकोल्यातील पावसाची जागतिक पातळीवर नोंद

अकोला जिल्हात यंदा गुरुवारी 22 जुलैला झालेल्या पावसाची नोंद ही जागतिक पातळीवर करण्यात आली आहे. अकोल्यात 22 जुलैला 24 तासात 184.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत इतिहासात असा पाऊस पडलेला नाही. तसेच दरवर्षी बाकीच्या देशांमध्ये जोरदार पाऊस पडतो. त्याची विक्रमी नोंद केली जाते. पण पाहिल्यांदाच महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याची नोंद ही जागतिक पातळीवर करण्यात आली आहे. जगातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या यादीत अकोला जिल्ह्याचे नाव हे आठव्या क्रमांकावर आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?

जिल्हा –         पाऊस – टक्केवारी

1) बुलडाणा – 354.9 मिमी – 125.9 टक्के

2) अकोला – 341.2 मिमी 112.8 टक्के

3) वाशिम – 498.4 मिमी 143.6 टक्के

4) अमरावती – 390.9 मिमी 111.2 टक्के

5) यवतमाळ – 510.6 मिमी 145.8 टक्के

अकोल्यात मुसळधार 

अकोला शहरासह जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या धुव्वाधार पाऊस झाला आहे. यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी पुन्हा जिल्हातल्या अकोला, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा तालुक्यात पावसाचा तडाखा बसला आहे. तसेच अनेक तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला असून तेल्हारा तालुक्यातील नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे तेल्हारा-पाथर्डीमार्गे अकोट आणि तेल्हारा-वरवटचा संपर्क तुटला आहे.

(Akola district Record rainfall ranks 8 in the list of world highest rainfall)

संबंधित बातम्या : 

पूर आणि दरडीमुळे राज्यात 76 मृत्यू, 59 बेपत्ता, 90 हजार लोकांचं स्थलांतर, 75 जनावरे दगावली: अजित पवार

घरे जमीनदोस्त, माणसं गाडली, संसार मातीमोल अन् सर्वत्र चिखलांचं साम्राज्य; वाचा, तळीये दुर्घटनेचा आँखो देखा हाल!

अमरावती विभागात सरासरी 130 टक्के पाऊस, कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान? 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI