Akola Janta Curfew | अकोटमध्ये 3 ते 9 जुलैपर्यंत 'जनता कर्फ्यू', नागरिकांनी सहकार्य करावं, बच्चू कडू यांचं आवाहन

अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहरात कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री बच्चू कडू यांनी 3 जुलै ते 9 जुलै दरम्यान शहरात जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे.

Akola Janta Curfew | अकोटमध्ये 3 ते 9 जुलैपर्यंत 'जनता कर्फ्यू', नागरिकांनी सहकार्य करावं, बच्चू कडू यांचं आवाहन

अकोला : अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहरात (Akola Janta Curfew) कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री बच्चू कडू यांनी 3 जुलै ते 9 जुलै दरम्यान शहरात जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. नागरिकांनी स्वतःहून यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे (Akola Janta Curfew).

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अकोट पंचायत समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी नेते मंडळी तसेच, नगरसेवक व्यापारी संबंधित अधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती. यावेळी बच्चू कडू यांनी आकोट शहर आणि तालुक्यात कोरोना संक्रमण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली.

स्थानिक नेतेच जर गंभीर नसतील, तर जनता गंभीर कशी होणार, हा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. कोरोनाला हरवायचे असेल, तर एकजूट होणे आवश्यक आहे. कोरोना संक्रमणावर अंकुश लावण्यासाठी 3 जुलै ते 9 जुलैपर्यंत 7 दिवसांचा जनता कर्फ्यू आवश्यक असल्याचं मत व्यक्त करत पालकमंत्र्यांनी त्यांनी जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे (Akola Janta Curfew).

अकोला जिल्हातल्या तेल्हारा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव, राष्ट्रीय वरीष्ठ पक्षाच्या पदाधिकाऱ्याला लागण

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एका राष्ट्रीय वरीष्ठ पक्षाच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्याला लागण झाल्याने रुग्ण संख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावात आरोग्य तपासणीला सुरुवात झाली आहे. तसेच, संपूर्ण गावात फवारणीही करण्यात आली आहे.

Akola Janta Curfew

संबंधित बातम्या :

Kolhapur Corona Death | कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयातून पळाला, रिक्षाने प्रवास करत घरी, उपचारादरम्यान मृत्यू

Wardha Corona | कोरोनाचा संशय, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबाचा नकार, 3 तास मृतदेह पडून, प्रशासनाकडून अंत्यसंस्कार

Nashik Curfew | नाशिक शहरात पुन्हा संचारबंदी, संध्याकाळी सातनंतर बाहेर पडल्यास कारवाई

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *