Corona Update | अकोल्यात 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?

अकोल्यात उद्यापासून 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. (Akola District Lockdown New Guidelines) 

Namrata Patil

|

Feb 22, 2021 | 9:01 PM

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अकोल्यात उद्यापासून 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काही निर्देश जारी केले आहेत. अकोला शहरासह मूर्तिजापूर आणि अकोट या शहरांना हे नियम लागू होणार आहे. (Akola District Lockdown New Guidelines)

अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात चिकन मटणची दुकाने सुरु राहणार आहेत. तसेच दूधाचे घरपोच वितरणही सुरु ठेवले जाणार आहे. मात्र या जिल्ह्यात पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहे.

अकोला जिल्ह्यात 19 फेब्रुवारीपासून रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच येथे रविवारी लॉकडाऊन राहणार असून पुढील आदेशापर्यत रात्रीची संचारबंदी कायम असणार आहे. अत्यावश्यक सेवांना संचारबंदीतून वगळण्यात आले आहे.

अकोल्यात काय सुरु, काय बंद?

💠खाद्य गृहे, रेस्टॉरंट सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत सुरू राहतील.

💠किचन आणि खाद्यगृहांना फक्त घरपोच सेवा देण्यासाठी परवानगी राहील.

💠दुधाचे घरपोच वितरण सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 5 ते 7 राहील.

💠सर्व खाजगी आणि वैद्यकीय सेवा पशुचिकित्सक सेवा त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरु राहतील.

💠सर्व रुग्णालय आणि रुग्णालयाची निगडित सेवा त्यांच्या वेळेवर सुरू राहतील.

💠औषधांची दुकाने जी 24 तास सुरू ठेवण्याबाबत अनुज्ञेय आहेत ती दुकाने तसेच उर्वरित औषधांचे दुकाने सकाळी आठ ते दुपारी तीनपर्यंत सुरु राहतील.

💠अकोला शहरातील अत्यावश्यक सेवेसाठी पाच पेट्रोल पंप सकाळी 8 ते 3 या कालावधीत सुरू राहील

💠त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील एक पेट्रोल पंप सुरु ठेवण्यात येतील.

💠कृषी सेवा केंद्र आणि कृषी निविष्ठांची दुकाने कृषी प्रक्रिया उद्योग हे सकाळी 8 ते 3 वाजेपर्यंत सुरू राहील.

💠मांस विक्रीचे दुकान आणि अंडे विक्रीचे दुकान सकाळी 8 ते 3 वाजेपर्यंत सुरू राहील.

राज्यात कोरोनाचा कहर 

राज्यात आज कोरोनाचे 5 हजार 210 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 हजार 35 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 18 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 19 लाख 99 हजार 982 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.96 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा 2.46 टक्क्यांवर आहे.

दरम्यान राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढ आहेत. बऱ्याच महिन्यांनी कोरोनाने डोके वर काढल्यामुळे आरोग्य प्रशासन तसेच राज्य सरकार अलर्टवर आहे. सरकारकडून कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, काही ठिकाणी कोरोना संसर्गाला नागरिकांनी अद्यापही गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन स्थानिक जिल्हा प्रशासनांनी लॉकडाऊन आणि संचारबंदीचा निर्णय घेतला आहे.  (Akola District Lockdown New Guidelines)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update : थोडासा दिलासा! सोमवारी 5 हजार 210 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 5 हजार 35 रुग्ण कोरोनामुक्त

कोणकोणत्या जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी?, वाचा सविस्तर रिपोर्ट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें