इंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोलेत कडकडीत बंद, तृप्ती देसाईंविरोधात कारवाईची मागणी

तृप्ती देसाईंनी इंदोरीकरांना काळं फासण्याचं वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात आज अकोलेत कडकडीत बंद पाळण्यात आला.

इंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोलेत कडकडीत बंद, तृप्ती देसाईंविरोधात कारवाईची मागणी
Follow us
| Updated on: Feb 23, 2020 | 4:23 PM

शिर्डी : भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई (Trupti Desai) विरुद्ध प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj) वाद आणखी वाढत चालला (Akole Band) आहे. तृप्ती देसाईंनी इंदोरीकरांना काळं फासण्याचं वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात अकोले येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. संपूर्ण शहर ज्ञानोबा-तुकारामांच्या गजराने दुमदुमून गेले होते. अकोले तालुक्यातील सर्वच गावांनी या बंदमध्ये सहभाग घेतला. इंदोरी गावातून निघालेल्या मोटार सायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तालुक्यातील 85 पेक्षा अधिक गावांनी ग्रामसभेत केलेले ठराव यावेळी प्रशासनाला देण्यात आले.

अहमदनगरचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले तालुक्यात बंद (Akole Band) पुकारण्यात आला. सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, इंदोरीकरांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही तृप्ती देसाई यांनी त्यांना काळं फासण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला.

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्या नंतर PCPNDT कायद्यानुसार त्यांना नोटीस बजावण्यात आली. निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या वतिने दिलगिरी व्यक्त करत नोटीसीला उत्तर देण्यात आलं. मात्र, यादरम्यान भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी अकोलेत येऊन इंदोरीकरांना काळे फासण्याचं वक्तव्य केलं. तृप्ती देसाईंच्या या वक्तव्यानंतर अकोले तालुक्यातील ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी अकोले बंदचा इशारा दिला.

अकोले तालुक्यात आज सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. तर सकाळी 9 वाजता इंदोरीकरांच्या इंदोरी या मूळ गावातून बाईक रॅली काढत युवकांनी आपला पाठिंबा दर्शवला (Akole Band). इंदोरी, सुगाव, कळस मार्गे काढण्यात आलेल्या या रॅलीची सांगता शहरातील महात्मा फुले चौकात झाली आणि त्यानंतर निषेध मोर्चाला सुरुवात झाली.

महात्मा फुले चौकातून निघालेला मोर्चा हा एखाद्या दिंडी प्रमाणेच दिसत होता. वारकरी संप्रदायासह सर्वच पक्षातील कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. ज्ञानोबा-तुकारामांच्या गजरात हाती टाळ मृदुंग घेत अबाल-वृद्ध यात सहभागी झाले होते. यानंतर बाजार तळावर मोर्चाच रूपांतर सभेत झालं. यावेळी मधुकर पिचड, राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे, अशोक भांगरे, माजी आमदार वैभव पिचड यासह वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येन उपस्थित होता (Akole Band). अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या तृप्ती देसाई विरोधात कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

तृप्ती देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी

भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांना फोनवरुन धमकी देणाऱ्या महाराजांनी (Somnath Maharaj Apologies) आता त्यांची जाहीर माफी मागितली आहे. “माझ्या फोनवरील वक्तव्याशी इंदोरीकर महाराजांचा संबंध नाही. माझा राग अनावर झाल्याने मी बोललो. माझ्या संभाषणाने त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो” (Somnath Maharaj Apologies), असं तृप्ती देसाई यांना धमकी देणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या सोमनाथ महाराज भोर यांनी म्हटलं.
Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.