कोल्हापूर जिल्ह्यात आढळला निरंगी (अल्बिनो); या बुलबुल पक्षाची खात्रीशीर नोंद श्रीलंकेत

या अल्बिनो पक्षाची त्यांनी माहिती घेतल्यानंतर त्यांना असे आढळून आले की, अल्बिनो निरंगीपणा हा मेलानिनच्या कमतरतेमुळे येतो. गुरुवारी ज्यावेळी हा पक्षी त्यांना आढळून आला त्यावेळी पक्षी निरीक्षण करत असताना त्यांना हा बुलबुल एकटा सूर्य स्नान घेताना दिसून आला.

कोल्हापूर जिल्ह्यात आढळला निरंगी (अल्बिनो); या बुलबुल पक्षाची खात्रीशीर नोंद श्रीलंकेत
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 7:13 AM

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्याला (Kolhapur District) निसर्गाचे वरदान लाभले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये गर्द हिरवळीने नटलेले डोंगर आहेत. त्यामुळे आजही कोल्हापूर जिल्ह्यात अनेक वन्यजीवांचे वास्तव्य आहे. यामध्ये वन्यप्राणी, वन्यपक्षी, सरपटणारे प्राणी, वाघ, हत्ती, गवा, फुलपाखरांच्या अनेक जाती येथे पाहायला मिळतात. त्यामुळे कोल्हापूरातील अनेक निसर्गप्रेमी निरीक्षण आणि नोंदी ठेवण्यासाठी राधानगरी, आजरा, चंदगड,आंबोली, आंबा घाट या परिसरात जात असतात. हाच छंद जोपसणारे आणि पेशाने शिक्षक असेलेले निसर्ग प्रेमी वैभव घाटगे (Vaibhav Ghatage) यांनी निरंगी (अल्बिनो) (albino) बुलबुल या पक्षाची नोंद केली आहे. हा पक्षी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये त्यांना आढळून आला आहे. या निरंगी (अल्बिनो) बुलबुल पक्षाला त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपले आहे.

कोल्हापुरात अल्बिनो…

शिक्षक आणि निसर्गप्रेमी वैभव घाटगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात सफर करुन अनेक पक्षांची आणि प्राण्यांची नोंदी केल्या आहे. ते नियमितरीत्या पक्षी निरीक्षण व नोंदी तसेच छायाचित्रण करत असतात. 28 जुलै रोजी कागल तालुक्यातील काही गावाजवळील डोंगराळ भागातून फिरताना हा अल्बिनो बुलबुल त्यांना दिसून आला.

albino

मेलानिनच्या कमतरतेमुळे येतो

या अल्बिनो पक्षाची त्यांनी माहिती घेतल्यानंतर त्यांना असे आढळून आले की, अल्बिनो निरंगीपणा हा मेलानिनच्या कमतरतेमुळे येतो. गुरुवारी ज्यावेळी हा पक्षी त्यांना आढळून आला त्यावेळी पक्षी निरीक्षण करत असताना त्यांना हा बुलबुल एकटा सूर्य स्नान घेताना दिसून आला. त्या नंतर हा पक्षी आहारासाठी विविध झाडावर त्याची तो मार्गक्रमणा करतानाही आढळून आलासायनोट्स कॅफर शास्त्रीय नाव

albino

थोडासा दीड स्वभावाचा हा पक्षी

हा पक्षी टणटणीची पक्व फळे मोठ्या प्रमाणात खाताना दिसून आला. या बुलबुलची खात्रीशीर नोंद श्रीलंकेमध्ये झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लाल बुडाचा बुलबुल (pscnonotus cafer सायनोट्स कॅफर) या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. मानवीवस्ती नजीक हा पक्षी मोठ्या प्रमाणात दिसून येतो. टणटणीच्या प्रसारात याचा वाटा मोठ्या प्रमाणात असतो थोडासा दीड स्वभावाचा हा पक्षी मानवीवस्ती देखील नियमित घरटे करतो. याची उंची 20 सेमी असून सामान्य बुलबुलाचे डोके काळसर असते व बुडाला लाल रंग असतो. कावळा चिमणी या पक्षांबरोबरच मानवी वस्तीनजीक दिसणारा हा बुलबुलदेखील सहजपणे दृष्टीस पडतो.

सह्याद्रीमध्ये बुलबुल डिसेंबर ते मेमध्ये

बुलबुल बेरी, फळे, सुरवंट, किडे खातो सह्याद्रीमध्ये बुलबुल डिसेंबर ते मे महिन्यात घरटे करतात. मादी 2-3 अंडी घालते. या अंड्याचा आकार 21 मी.मी. असतो, बारा दिवसानंतर त्याची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात. घराजवळ घरटे करत असल्याने याच्या पारिवारिक जीवनाचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करता येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.