मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपत्रिकांची हेराफेरी झाल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार

झालेल्या मतदानापेक्षा 186 मतपत्रिका जास्त निघाल्या तर अनेक पत्रिका कोऱ्या असल्याचा सिद्धेश्वर मुंडे यांचा दावा आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपत्रिकांची हेराफेरी झाल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार
vote
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 9:00 AM

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपत्रिकांची हेराफेरी झाल्याचा गंभीर आरोप पदवीधरचे उमेदवार सिद्धेश्वर मुंडे यांनी केला आहे. इतकंच नाही तर निवडणुकच्या चौकशीसाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडेदेखील तक्रार दाखल केली आहे. न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची भूमिका सिद्धेश्वर मुंडे यांनी घेतली आहे. (Allegation of rigging of ballot papers in Marathwada graduate elections complaint to Election Commission)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, झालेल्या मतदानापेक्षा 186 मतपत्रिका जास्त निघाल्या तर अनेक पत्रिका कोऱ्या असल्याचा सिद्धेश्वर मुंडे यांचा दावा आहे. मतदान केंद्राध्यक्षाच्या सह्यांमध्येही तफावत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. यामुळे संपूर्ण मतपत्रिकांची तपासणी करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यावर आता पुढे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आणि चौकशीतून काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण पुन्हा एकदा विजयी झाले. सतीश चव्हाण यांना तब्बल 116638 मते मिळाली. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना 58743 मतांवर समाधान मानावं लागलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण जवळपास 57895 मताधिक्क्यानं विजयी झाले.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर त्यांच्याविरोधात भाजपचे शिरीष बोराळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. सतीश चव्हाण हे सलग दोन वेळा औरंगाबाद पदवीधरच्या जागेवर निवडून आले होते. आता तिसऱ्यांदा सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवला. गेल्यावेळी सतीश चव्हाण यांच्याविरोधात बोराळकरच उभे होते. मात्र, तेव्हासुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यंदा महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवत असल्यानं ती चुरशीची होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं, अखेर या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण विजयी झाले. (Allegation of rigging of ballot papers in Marathwada graduate elections complaint to Election Commission)

संबंधित बातम्या: 

चुरस आहे पण विधान परिषदेच्या 6 जागाही आम्ही जिंकू, पुणे तर वनवेच!- चंद्रकांत पाटील

पदवीधर निवडणूक : विश्वजीत कदम आणि भाजप उमेदवाराची भेट, मतदानादिवशीच्या भेटीने भुवया उंचावल्या

(Allegation of rigging of ballot papers in Marathwada graduate elections complaint to Election Commission)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.